सांगलीवाडीत विवाहितेवर बलात्कार | पुढारी

सांगलीवाडीत विवाहितेवर बलात्कार

सांगली ; पुढारी वृत्तसेवा : विवाहितेला लग्नाचे आमिष दाखवून सांगलीवाडी येथे भाड्याच्या खोलीत सलग पाच महिने बलात्कार केल्याचा प्रकार मंगळवारी उघडकीस आला. याप्रकरणी कर्नाटकातील एकाविरुद्ध सांगली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

सचिन आनंद टोळे (वय 35, रा. महालिंगपूर, ता. मुधोळ, जि. बागलकोट) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे. पीडित विवाहिता पतीसोबत राहत होती.

कौटुंबिक वादातून पतीसोबत सातत्याने तिचे भांडण होत असे. पती तिला दररोज मारहाण करीत होता. त्यामुळे काही महिन्यांपूर्वी ती पतीपासून विभक्त राहू लागली. त्यावेळी संशयित टोळे याने तिला लग्नाचे आमिष दाखविले. नोकरी लावतो, असे सांगून तिला पाच महिन्यांपूर्वी सांगलीत आणले. येथे भाड्याने खोली घेण्याचा प्रयत्न केला. त्याने सांगलीवाडी येथे भाड्याने खोली घेतली. 11 जानेवारी ते 28 मे 2022 या कालावधीत त्याने तिच्यावर बलात्कार केला. नोकरीचेही आमिष दाखवून लैंगिक शोषण केले.

महिलेने लग्नासाठी तगादा लावल्यानंतर त्याने नकार दिला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिने मंगळवारी फिर्याद दाखल केली. टोळे याच्याविरुद्ध बलात्कार व फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

Back to top button