पैठण : भाजपच्या वतीने जितेंद्र आव्हाडांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन | पुढारी

पैठण : भाजपच्या वतीने जितेंद्र आव्हाडांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन

पैठण; पुढारी वृत्तसेवा : महाड येथील आंदोलनात मनुस्मृती जाळत असल्याच्या स्टंटबाच्या नाटकात महामानव विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडल्यामुळे गुरुवारी (दि.३०) पैठण तालुका भाजप पदाधिकाऱ्यांनी शरद पवार गटाचे राष्ट्रवादी नेते जितेंद्र आव्हाड यांच्या फोटोला जोडे मारून आंदोलन केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडणारे राष्ट्रवादी नेते जितेंद्र आव्हाड यांच्या कृत्याचा निषेध गुरुवारी (दि.30) पैठण येथील बस स्थानक चौकामध्ये फोटोला जोडे मारून आंदोलन केले. याप्रसंगी भाजप तालुका अध्यक्ष लक्ष्मण औटे, माजी नगराध्यक्ष सुरज लोळगे, शेखर पाटील, महेश जोशी, मनोज लोहारे, सतीश आहेर, गणीभाई बागवान, भाऊसाहेब बोरुडे, प्रशांत आव्हाड, सुरेश गायकवाड, वैभव पोहेकर यांच्यासह या आंदोलनात मोठ्या प्रमाणावर शहरातील व तालुक्यातील भाजप पदाधिकारी सहभाग झाले होते.

Back to top button