कोल्हापूरच्या संदीप पाटील यांची बैलजोडी प्रथम | पुढारी

कोल्हापूरच्या संदीप पाटील यांची बैलजोडी प्रथम

कवठेमहांकाळ : पुढारी वृत्तसेवा :  करोली (टी) (ता.कवठेमहांकाळ) येथे बैलगाडी शर्यतीत कोल्हापूरच्या संदीप पाटील यांच्या हरण्या-छब्या बैलजोडीने प्रथम क्रमांकाचे एक लाख अकरा हजारांचे बक्षीस पटकावले. प्रथम क्रमांकाच्या बैलगाडी शर्यती विजेत्यास माजी मंत्री अजितराव घोरपडे यांच्याहस्ते बक्षीस देण्यात आले.

शर्यतीस जलसंपदा मंत्री जयंत पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष देवराज पाटील, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य टी. व्ही.पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, तानाजी यमगर, काँग्रेसचे संजय हजारे, सुभाष सूर्यवंशी, मारुती पवार, सुहास पाटील, दीपक शिंदे, पांडुरंग पाटील, तात्यासाहेब नलवडे, दत्ताजी पाटील उपस्थित होते.

निकाल : अ गट – प्रथम संदीप पाटील, धोंडीराम गाडगीळ (कोल्हापूर), द्वितीय – महेश बोंद्रे (हरिपूर), तृतीय – संतोष गलांडे (अंकले). ब गट निकाल – प्रथम सचिन पाटील (परिते), द्वितीय – जयसिंग यमगर (रांजणी), तृतीय – बाळू हजारे (सराटी). सूत्रसंचालन एम. सी. खटावकर यांनी केले.

Back to top button