‘तासगाव’च्या बिलासाठी आत्महत्येचा पवित्रा | पुढारी

‘तासगाव’च्या बिलासाठी आत्महत्येचा पवित्रा

तासगाव : पुढारी वृत्तसेवा

तासगाव साखर कारखान्याची 17 कोटी रुपयांची थकीत ऊस बिले तातडीने मिळावीत, या मागणीसाठी गुरूवारी शेतकर्‍यांनी आत्महत्येचा पवित्रा घेतला. त्यासाठी त्यांनी फास लावण्यासाठी दोरी व विषारी कीटकनाशक आणले होते. तहसील कार्यालयापुढे हे आंदोलन केले.

तासगाव कारखान्याकडील थकीत ऊस बिले तत्काळ मिळावीत, या मागणीसाठी ऊस उत्पादक शेतकरी आणि काँग्रेसच्या ओबीसी सेलचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. विवेक गुरव, किसान सेलचे जिल्हाध्यक्ष जोतिराम जाधव, बळीराजा संघटनेचे शशिकांत डांगे यांनी आज गुरुवारी सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा देत आंदोलन केले.

तत्कालीन तहसीलदार कल्पना ढवळे यांनी आर.आर.सी. अंतर्गत कारवाईस हेतूपुरस्सर टाळाटाळ केल्याने ऊस उत्पादक शेतकर्‍यांवर देशोधडीस लागण्याची वेळ आली आहे. त्यामुळे त्यांच्या कारभाराची सखोलपणे चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली. गुरुवारी सकाळी अकरा वाजता तहसील कार्यालयासमोर शेतकरी जमा झाले. उपस्थित शेतकर्‍यांनी तहसील कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर ठिय्या मारला. आंदोलक शेतकर्‍यांचा आक्रमक पवित्रा बघून पोलिस निरीक्षक संजीव झाडे यांच्यासह मोठा पोलिस फौजफाटा
तैनात

Back to top button