विट्यात किरकोळ कारणावरून मजूराचा डोक्यात फरशी घालून खून; एकास अटक

विट्यात किरकोळ कारणावरून मजूराचा डोक्यात फरशी घालून खून; एकास अटक

विटा; पुढारी वृत्तसेवा : विट्यात किरकोळ कारणावरून डोक्यात फरशी घालून एका मजूराचा खून करण्यात आला. ही घटना कराड रस्त्यावर गुरूवारी (दि.३०) रात्री साडेआठच्या सुमारास घडली. राजेंद्र भाऊसो यादव (५८, कडेपूर, ता. कडेगांव) असे खून झालेल्या मजूराचे नाव आहे. याप्रकरणी संशयित आरोपी सागर अशोक वाघमारे (३० शाहूनगर, विटा, ता. खानापूर) याला अटक करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक शरद मेमाणे यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती अशी, विट्यातील कराड रस्त्यावरील नेवरी नाक्याजवळ दोन मजूरांची आपसात किरकोळ कारणावरून वादावादी झाली. यामध्ये संशयित सागर वाघमारे याला राग अनावर झाला. त्यानंतर रागाच्या भरात त्याने राजेंद्र यादव यांच्या डोक्यात फरशी घातली. त्यात यादव गंभीर जखमी झाले. याबाबत माहिती मिळताच पोलिस निरीक्षक शरद मेमाने यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर यादव यांना तातडीने ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान नेवरी नाक्यावर खून झाल्याची माहिती समजताच शहरात खळबळ माजली. बघ्यांनी घटनास्थळी गर्दी केली होती. विटा पोलिसांच्या पथकाने अवघ्या बारा तासात खूनाचा छडा लावत संशयित आरोप सागर वाघमारेच्या मुसक्या आवळल्या. त्याला अटक करून येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर हजर केले असता ६ जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याबाबत अधिक तपास पोलिस निरीक्षक शरद मेमाने करत आहेत.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news