सांगली : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज जिल्हा दौर्‍यावर | पुढारी

सांगली : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज जिल्हा दौर्‍यावर

सांगली : पुढारी वृत्तसेवा

केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी शनिवारी जिल्हा दौर्‍यावर आहेत. बोरगाव ते वाटंबरे चौपदरीकरण महामार्गाचे तसेच सांगोला-सोनंद-जत या महामार्गाच्या कामाचे लोकार्पण गडकरी यांच्या हस्ते सांगलीतून होणार आहे. भिवघाट येथे शेतकरी मेळावा होणार आहे. गडकरी यांचे शनिवारी सकाळी 9.50 वाजता कवलापूर हेलिपॅड येथे आगमन होणार आहे. सांगलीत नेमिनाथनगरमधील मैदानावर सकाळी 10 वाजता राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाचे लोकार्पण गडकरी यांच्या हस्ते व खासदार, आमदारांच्या उपस्थितीत होणार आहे. सांगली ते सोलापूर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 166 मधील बोरगाव ते वाटंबरे दरम्यानच्या 52 किलोमीटर लांबीच्या चौपदरीकरण रस्त्याचे लोकार्पण होणार आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 965 जी यावरील सांगोला ते सोनंद ते जत या मार्गाचे पुनर्वसन आणि उन्नतीकरण केले आहे. त्याचे लोकार्पण होणार आहे.

सकाळी 11.15 वाजता खरे क्लब हाऊस येथे पीएनजी सराफ पेढीच्या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. तिथे गडकरी यांची प्रकट मुलाखत होणार आहे. दुपारी 12.15 वाजता उष:काल अभिनव इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सचे उद्घाटन गडकरी यांच्या हस्ते व पालकमंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. दुपारी 2.30 वाजता विश्वचंद्र मंगल कार्यालय खानापूर रोड भिवघाट येथे शेतकरी मेळाव्यास उपस्थित राहणार आहेत.

 

Back to top button