मुंबई-पुणे एक्‍स्‍प्रेसवेवर भीषण अपघात, ट्रेलर आणि टेम्पो १०० फूट दरीत कोसळले, एक ठार | पुढारी

मुंबई-पुणे एक्‍स्‍प्रेसवेवर भीषण अपघात, ट्रेलर आणि टेम्पो १०० फूट दरीत कोसळले, एक ठार

खोपोली; पुढारी वृत्‍तसेवा : मुबंई-पुणे एक्‍स्‍प्रेसवेवर अपघाताची मालिका सतत सुरूच आहे. भरधाव वेगात असलेल्या ट्रेलरचा टायर फुटून ट्रेलरने समोरील टेम्पोला जोरदार धडक दिली. यामध्ये दोन्ही वाहने 100 फूट खोल दरीत कोसळली. यातील ट्रेलर चालक ठार झाला असून, एक गंभीर जखमी झाला आहे. ही घटना आज (बुधवार) पहाटे 4 वाजण्याच्या दरम्यान घडली.

मुबंई-पुणे एक्सप्रेस वेवर पुण्याहून मुंबईकडे ट्रेलर जात होता. यावेळी तो बोरघाटात भरधाव वेगात असणाऱ्या ट्रेलरचा टायर फुटल्याने ट्रेलरने समोरील टेम्पोला जोरदार धडक दिली. यामध्ये टेम्पो आणि ट्रेलरचा केबीन 100 फूट खोल दरीत कोसळला.

या भीषण अपघातात ट्रेलरमधील चालक अजित जाधव यांचा जागीच मृत्यू झाला, तर टेम्पोमधील चालक गंभीर जखमी झाला. या अपघाताची माहिती मिळताच बोरघाट पोलीस, देवदूत यंत्रणा, अपघातग्रस्त टीमचे सदस्य तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्‍यांनी टेम्पोमध्ये आणि ट्रेलरमध्ये अडकलेल्या व्यक्तींना बाहेर काढून पुढील उपचारासाठी रूग्‍णालयात दाखल करण्यात आले.

हेही वाचा : 

Back to top button