Leopard Attack: पानशेत-वरसगाव परिसरात बिबट्यांचा धुमाकूळ चार जनावरांचा बळी; पर्यटकांना वनविभागाचा सावधानतेचा इशारा

कशेडी, गोंडेखेल, मोसे बुद्रुक भागात बिबट्यांचा वाढता वावर; शेतकरी-गुराख्यांमध्ये भीतीचं वातावरण
Leopard Attack
Leopard AttackPudhari
Published on
Updated on

वेल्हे: पानशेत आणि वरसगाव धरण परिसरातील कशेडी, गोंडेखेल व मोसे बुद्रुक भागात बिबट्यांचा धुमाकूळ सुरू आहे. बिबट्याने गेल्या 2 दिवसांत 4 जनावरांचा फडशा पाडला आहे. या घटनांमुळे स्थानिक शेतकरी आणि गुराख्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वन विभागाने पर्यटक व नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. (Latest Pune News)

Leopard Attack
Kartiki Wari: कार्तिकी वारीपूर्वी कामे युद्धपातळीवर पूर्ण करा प्रांताधिकारी अनिल दौंडे यांचे आदेश; आळंदीत पूर्वनियोजन बैठक

बिबट्यांच्या वाढत्या वावरामुळे नागरिकांना संध्याकाळनंतर बाहेर पडणे धोकादायक ठरत आहे. या भागात वन विभागाने गस्त वाढवून शेतकऱ्यांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे, अशी माहिती वन परिमंडळ अधिकारी स्मिता अर्जुने यांनी दिली.

Leopard Attack
Ponds Scheme: सामूहिक शेततळे योजनेत 9 हजार शेतकऱ्यांची निवड; 75 टक्के अनुदानाने 20 हजार हेक्टर क्षेत्र संरक्षित सिंचनाखाली

कशेडी येथील संतोष निवंगुणे यांची एक शेळी, मोसे बुद्रुक येथील जनाबाई ढेबे यांचे एक वासरू, बाबुराव बावधने यांचे रेडकू आणि गोंडेखेल येथील धावू मरगळे यांची एक शेळी असा एकूण चार जनावरांचा बिबट्यांनी फडशा पाडला आहे. वनरक्षक स्वप्निल उंबरकर व वन विभागाच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. सततच्या पावसामुळे पानशेतच्या जंगल परिसरात झाडे, झुडपे आणि गवत वाढल्याने बिबटे खाद्याच्या शोधात खेड्यांच्या आसपास दबा धरून बसत असल्याचे वन अधिकाऱ्यांचे निरीक्षण आहे.

Leopard Attack
Murlidhar Mohole: “मी शब्द पाळला, आरोप खोटे!” केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची जैन बोर्डिंग प्रकरणावर भूमिका स्पष्ट

शेतकरी चरण्यासाठी शेळ्या, गाई-वासरे मोकाट सोडत असल्याने बिबट्यांना सहज हल्ला करण्याची संधी मिळते. त्यामुळे ग्रामीण भागात व पर्यटकांनी मुख्य रस्त्याच्या बाहेर, जंगल परिसरात न जाण्याचे आवाहन पानशेत वन विभागातर्फे करण्यात आले आहे. दरम्यान, हल्ल्यात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई देण्याची मागणी कोशीमघरचे उपसरपंच अक्षय कडू यांनी केली आहे.

Leopard Attack
Road Digging: सीसीटीव्ही खोदाईमुळे पुण्याच्या रस्त्यांची वाट! भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांची पालिकेकडे तातडीच्या कारवाईची मागणी

भय इथले संपत नाही‌’

वाल्हे नजीक भुजबळ कामठवाडी (ता. पुरंदर) परिसरातील शेतातील विहिरीजवळ गुरूवारी (दि. 30) बिबट्याचे भर दुपारी दर्शन झाले. परिणामी परिसरातील ग्रामस्थ व शेतकरीवर्गामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांनी वनविभागाकडे तातडीने उपाययोजनांची मागणी केली आहे.

Leopard Attack
Ajit Pawar Order Ignored: पालकमंत्री अजित पवारांचे आदेश ठंडे बस्त्यात! समाविष्ट गावांतील बांधकाम परवानगी अद्याप पीएमआरडीएकडेच

मागील काही दिवसांपासून वाल्हे परिसरात कामठवाडी, वागदरवाडी व पंचक्रोशीत, तसेच मांडकी, पिंगोरी या परिसरात बिबट्याचे पाळीव जनावरांवर हल्ले आणि शेतशिवारातील वावर वाढलेला दिसून येत आहे. गुरूवारी भर दुपारी भुजबळ कामठवाडी हद्दीतील आंब्याचा मळा येथील ओढ्याजवळील विहीर परिसरात कोमल सुशील भुजबळ यांना बिबट्या ओढ्याच्या बाजूकडे जाताना दिसून आला. भुजबळ यांनी प्रसंगावधान राखून जवळपासच्या शेतात काम करीत असलेल्या लोकांना बिबट्याची माहिती दिली. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहत आपले काम केले.

Leopard Attack
Jain Boarding: जैन बोर्डिंग जमीन विक्री व्यवहार रद्द; ट्रस्टच्या मालमत्तेची पुन्हा नोंदणीचे आदेश

अंगावर काटा आला होता : कोमल भुजबळ

इतक्या जवळून बिबट्या पाहिल्याचा हा पहिलाच अनुभव होता. त्या क्षणी अंगावर काटा आला होता; मात्र घाबरून आरडाओरडा केल्यास काही विपरीत घडू शकते, हे लक्षात घेऊन मी गप्पच राहिले. पुढे काही अंतरावर लपून, चालत गेल्यावर तातडीने परिसरातील शेतकरीवर्गाला याची माहिती देत सावध केले, अशी माहिती कोमल भुजबळ यांनी दिली.

Leopard Attack
Maharashtra Olympic Association : ऑलिंपिक असोसिएशनच्या निवडणुकीसाठी अजित पवार गटाच्‍या पॅनेलची घोषणा

बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी

कामठवाडी तसेच भुजबळ कामठवाडी, आंब्याचा मळा, सापिका या परिसरातील बहुतांश शेतीची कामे मागील आठवड्यापासून रखडली आहेत. वनविभाग मात्र याकडे सोईस्कर दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप येथील ग्रामस्थांमधून होत आहे. लवकरात-लवकर या परिसरात पिंजरा लावून, बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी येथील ग्रामस्थ, शेतकरीवर्गाकडून करण्यात आली आहे.

Leopard Attack
Who Was Rohit Arya: मुंबईत 17 मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण होता?

बिबट्याची थेट घराच्या ओट्यावर एंट्री!

आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर गावात बिबट्याच्या वावराने पुन्हा एकदा थरकाप उडवला आहे. वळसेमळा हद्दीत असलेल्या शेतकरी रामचंद्र ज्ञानेश्वर वळसे पाटील यांच्या घराच्या ओट्यावर बिबट्या अन्न-पाण्याच्या शोधात भटकंती करीत असल्याची घटना घराच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

Leopard Attack
मराठीच्या भवितव्याची चिंता करु नका, ती चिरंतर काळ टिकेल

ही घटना बुधवारी (दि. 29) पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास घडली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये बिबट्या अत्यंत शांतपणे घरासमोरच्या ओट्यावर फेरफटका मारताना स्पष्ट दिसत आहे. काही क्षण तो परिसरात थांबून पुन्हा अंधारात निघून गेला. यापूर्वीही दोनवेळा बिबट्या या परिसरात आल्याची पुष्टी शेतकरी रामचंद्र वळसे पाटील यांनी दिली असून, वारंवार होणाऱ्या बिबट्याच्या भेटीमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Leopard Attack
Namo Tourism Centres: राज्यातील चार किल्ल्यांच्या ठिकाणी सुरू होणारे 'नमो पर्यटन माहिती सुविधा केंद्र' काय आहे?

निरगुडसर परिसरातील वळसेमळा, टेमकरमळा, थोरातमळा या भागांत बिबट्यांचा वावर वाढला असून, पशुधनावर हल्ल्यांच्या घटनाही नोंदल्या जात आहेत. नागरिकांनी तातडीने या भागात पिंजरा बसवून बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी वन विभागाकडे केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news