Namo Tourism Centres: राज्यातील चार किल्ल्यांच्या ठिकाणी सुरू होणारे 'नमो पर्यटन माहिती सुविधा केंद्र' काय आहे?

राज्याच्या पर्यटन विभागाच्या वतीने पर्यटकांसाठी चांगल्या सुविधा मिळाव्यात, यासाठी राज्यातील प्रतापगड, शिवनेरी, साल्हेर आणि रायगड या चार किल्ल्यांच्या ठिकाणी 'नमो पर्यटन माहिती सुविधा केंद्र ' सुरू करण्यात येणार आहे.
Namo Tourism Centres
राज्यातील चार किल्ल्यांच्या ठिकाणी सुरू होणारे 'नमो पर्यटन माहिती सुविधा केंद्र' काय आहे?(Pudhari Photo)
Published on
Updated on

पुणे : राज्याच्या पर्यटन विभागाच्या वतीने पर्यटकांसाठी चांगल्या सुविधा मिळाव्यात, यासाठी राज्यातील प्रतापगड, शिवनेरी, साल्हेर आणि रायगड या चार किल्ल्यांच्या ठिकाणी 'नमो पर्यटन माहिती सुविधा केंद्र ' सुरू करण्यात येणार आहे.

राज्यातील पर्यटन वाढावे, पर्यटकांनी जास्तीत जास्त किल्ल्यांना भेटी द्याव्यात, या किल्ल्यांचा जाज्वल्य इतिहास आणि त्याचे महत्त्व लक्षात यावे, यासाठी 'नमो पर्यटन माहिती सुविधा केंद्र' सुरू करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात या चार किल्ल्यांचा समावेश करण्यात आला असून, त्याबाबत कार्यवाही लवकरच सुरू करण्यात येणार आहे. ही केंद्र सुरू करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने पन्नास कोटींचा निधी देण्यात येणार आहे.

Namo Tourism Centres
Pune News : विमाननगरच्या पबमध्ये गुन्हेगारांची थाटात डीजे पार्टी?

दरम्यान, या चार किल्ल्यांवर या केंद्रांना पर्यटकांकडून कसा प्रतिसाद मिळतोय, ही बाब पाहून पुढील टप्प्यात आणखी राज्यातील विविध किल्ले आणि पर्यटनस्थळांवर या प्रकारची केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. दरम्यान, प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत ही केंद्र सुरू करण्यात येणार आहेत.

...असे आहे 'नमो पर्यटन माहिती सुविधा केंद्र'

राज्यातील प्रमुख पर्यटनस्थळांवर (विशेषतः किल्ल्यांवर) पर्यटकांना माहिती, सुविधा आणि सेवा पुरविण्यासाठी 'नमो पर्यटन माहिती सुविधा केंद्र' उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात रायगड, प्रतापगड, शिवनेरी व साल्हेर या किल्ल्यांवर ही केंद्र उभारण्यात येणार आहेत. त्यानंतर राज्यातील सुमारे 75 पर्यटनस्थळांपर्यंत विस्तार करण्यात येणार आहे.

Namo Tourism Centres
Pune Airport CPR Rescue: विमानतळावर प्रवाशाला हृदयविकाराचा झटका; कर्मचाऱ्यांच्या तत्परतेने दिले जीवदान

मुख्य उद्दिष्टे

- पर्यटकांना एकाच ठिकाणी सर्व माहिती मिळावी

- इतिहास, स्थळाची माहिती, मार्गदर्शन, सुविधा इत्यादी

- युवक/युवतींना पर्यटन क्षेत्रातील कौशल्य विकास व रोजगारसंधी उपलब्ध करणे

- स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देणे

- राज्यातील पर्यटन पायाभूत सुविधा सुधारणे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news