Google Scholar चा उपयोग कसा कराल? ते नेमकं काय आहे? | पुढारी

Google Scholar चा उपयोग कसा कराल? ते नेमकं काय आहे?

पुढारी ऑनलाईन डेस्क :  Google Scholar : इंटरनेटवर कोणतीही गोष्ट सर्च करायची असेल तर Googleला कोणताही पर्याय नाही. सर्च इंजिन म्हणजे Google असंच आताचा समीकरण आहे. जेव्हा आपण Google वर सर्च करतो.

तेव्हा विविध प्रकारचा कंटेट दाखवला जातो. Google चे अल्गोरिदम युजर्सला अपेक्षित असलेला सर्वोत्तम सर्च रिझल्ट देण्याचा प्रयत्न करतात.

अधिक वाचा 

पण समजा तुम्हाला रिसर्च पेपर शोधायचा असेल तर? इंटरनेटवर उपलब्ध माहितीचा एकूण Volume इतका जास्त आहे की गुगल जे रिझल्ट दाखवतं. ते अनेक संशोधकांसाठी उपयोगाचे ठरत नाहीत. यावर Google ने २००४ पासूनच Google Scholar ही सेवा सुरू केलेली आहे.

Google Scholar वापर कसा करावा?

Google Scholar असे सर्च केल्यानंतर या साईटवर जाता येते. तेथून आपल्याला हव्या त्या की वर्डने सर्च करता येतो. यातील रिझल्ट हे फक्त रिसर्च पेपर असतात. इतर कोणतीही तत्सम माहिती या सर्चमध्ये मिळत नाही. त्यामुळे संशोधक, संशोधक विद्यार्थी किंवा ज्यांना रिसर्च पेपरमध्ये रस आहे, असे युजर्स यांच्यासाठी ही फारच उपयुक्त अशी साईट आहे.

या साईटचा अजून एक फायदा असा की एखादा रिसर्च पेपरला किती साईटेशन मिळाले आहेत, हेही दाखवलं जात असल्याने, पेपरची उपयुक्तताही समजून येते.

अधिक वाचा 

याच साईटवर Google Scholar Metrics ही उपलब्ध आहे. त्यातून टॉपचे १०० पब्लिकेशन दाखवले जातात. पाच वर्षांतील h-index and h-median metrics च्या आधाराने ही प्रकाशनं दाखवली जातात.

या साईटवर आपल्या आवडीच्या विषयांनुसार पब्लिकेशन शोधता येतात.

रिसर्च पेपर कोणत्या वर्षी प्रसिद्ध झाला आहे, त्यानुसारही सर्च करता येतो. आपण जेव्हा एखादा की वर्ड सर्च करतो, तेव्हा त्यासाठीचे इतर विषय ही गुगलकडून सुचवले जातात. त्याचाही चांगला उपयोग करता येतो. उदा. आपण Economics असे जर सर्च केले तर Suggestion मध्ये behavioral economics आणि इतर उपशाखाही दाखवल्या जातात.

संशोधकांचा आणि विद्यार्थी यांचा इंटरनेटवरील मित्र असंही आपण Google Scholarला म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही.

हे ही वाचलं का? 

VIDEO : ज्वालामुखीतून निर्माण झाली घोराडेश्वर डोंगरावरील गुहा…

Back to top button