नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : covaxin for children : कोरोना महारोगराईची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोरोनाची तिसरी लाट बालकांवर विशेष प्रभाव टाकेल, असेही बोलले जात आहे.
या अनुषंगाने कोव्हॅक्सिन (covaxin for children) लसीच्या चाचणी प्रक्रियेला वेग देण्यात आला आहे. दिल्ली एम्समध्ये चाचणीत सहभागी झालेल्या ६ ते १२ वयोगटातील मुलांना कोरोना लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे.
पुढील आठवड्यापासून २ ते ६ वर्षांच्या बालकांना देखील लशीचा दुसरा डोस देण्यात येईल. चाचणीत सहभागी झालेल्या बालकांना लशीचा दुसरा डोस देण्याची प्रक्रिया आठवड्याभरात पुर्ण होईल.
ऑगस्ट अखेरपर्यंत चाचण्यांचा अहवाल येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याच अहवालाच्या आधारे कोरोनाची लस बालकांसाठी किती प्रमाणात सुरक्षित आहे, हे स्पष्ट होणार असल्याचे कळते.
अधिक वाचा
तुर्त आतापर्यंतच्या चाचण्यांमध्ये बालकांवर लसीचा खास दुष्प्रभाव दिसून आलेला नाही. देशातील सहा रूग्णालयांमध्ये ५२५ बालकांवर लशीची क्लिनिकल ट्रायल केली जात आहे.
यानूसार वयोगटानूसार मुलांचे तीन श्रेणीत वर्गीकरण करण्यात आले आहे.
प्रत्येक वयोगटातील चाचणीत १७५ बालक सहभागी झाले आहेत.
चाचणीनूसार सर्वात अगोदर १२ ते १८ वयोगटातील मुलांना लस देण्यात आली. २ ते ६ वयोगटातील बालकांनादेखील लसीचा पहिला डोस लावण्यात आला आहे.
चाचण्यांनूसार आता सर्वांना दुसरा डोस लावण्यात येणार आहे.
अधिक वाचा
१२ ते १८ वयोगटातील मुलांवरील लशीची चाचणी पुर्णत्वाच्या जवळ आहे, अशी माहिती केंद्र सरकारकडून दिल्ली उच्च न्यायालयात दिली आहे.
कोव्हॅक्सिन संबंधीच्या चाचण्यांना पूर्ण होवू द्यावे. चाचण्याशिवायच बालकांना लसी टोचणे धोकादायक ठरेल, असे न्यायालयाने स्पष्ट केले होते.
हे वाचलं का?
VIDEO – आता परदेशी फळं मिळणार मुंबईच्या टेरेसवर