

भंडारा; पुढारी वृत्तसेवा : भंडारा जिल्ह्यात चारित्र्यावर संशय घेऊन पतीने गळा आवळून पत्नीचा खून केला. ही घटना भंडारा जिल्ह्यातील राजेदहेगाव येथील सुयोग नगरात शनिवारी मध्यरात्री घडली.
अधिक वाचा :
स्नेहलता लंकेश्वर खांडेकर (वय २४ वर्ष, रा. सुयोग नगर) असे मृत महिलेचे नाव आहे. लंकेश्वर खेमराज खांडेकर (वय ३४) असे आरोपी पतीचे नाव आहे. तो कंत्राटी कामगार आहे.
स्नेहलता आणि लंकेश्वर यांच्या लग्नाला ५ वर्षे झाली आहेत. त्यांना ४ वर्षांची मुलगी आहे.
स्नेहलताने सावरी येथील खासगी दवाखान्यात कंपाऊंडर म्हणून दीड वर्ष काम केले. मध्यंतरी तिच्या चारित्र्यावर लंकेश्वर संशय घेत असल्याने, तिने या दवाखान्यातील नोकरी सोडून दिली.
अधिक वाचा :
गोंदिया जिल्ह्यातील कोरोना सेंटरवर ती काम करु लागली. तिथील कोरोना परिस्थिती सुधारु लागल्याने तिही नोकरी गेली. त्यामुळे ती सुयोग नगर, राजेहदेगाव येथील पतीकडे परत आली.
स्नेहलताचा पती पती दिवसभर कंत्राटी कामावर जात होता. पण स्नेहलताचा प्रियकर तिला भेटायला येत असावा असा संशय त्यांच्या मनात यायचा.
अधिक वाचा :
यातूनच त्याने स्नेहलताचा गळा आवळून खून केला. या प्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. तपास ठाणेदार पी. ए. बैसाणे करीत आहेत.
हे ही वाचा :