पवारांचा हात आहे म्हणून मुख्यमंत्री शिवसेनेचा : खासदार अमोल कोल्हे

राजगुरूनगर ; पुढारी वृत्तसेवा : राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आहे. खेड तालुक्यात मात्र वाद, भांडणे लावण्याचे काम होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांचा डोक्यावर हात आहे म्हणून मुख्यमंत्री शिवसेनेचा आहे, याचा विचार श्रेयासाठी धडपड करणाऱ्यांनी करावा, असे प्रतिपादन खासदार अमोल कोल्हे यांनी केले. खासदार अमोल कोल्हे यांनी शिवसेनेचे उपनेते, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचे नाव न घेता टीका केली.
पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील पुणे-नाशिक महामार्गावरील खेड बाह्यवळण रस्त्याचे उद्घाटन व लोकार्पण शनिवारी (दि १७) खासदार कोल्हे, आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या उपस्थितीत झाला.
अधिक वाचा :
- देवेंद्र फडणवीस यांचे राज ठाकरेंबद्दल सूचक वक्तव्य
- चाकण : प्रेमप्रकरणातून २ तरुणांचा खून; मुलगी गंभीर, करंजविहिरे येथील घटना
खासदार अमोल कोल्हे यांची टीका
संपादीत झालेले शेतकरी, माजी सरपंच देवराम थिगळे यांच्या हस्ते झाले.तत्पूर्वी झालेल्या स्वागत समारंभात डॉ. कोल्हे यांनी आढळराव पाटील यांना लक्ष्य करीत टीका केली.
माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शिवसेनेचे कार्यकर्त्यांसह येऊन शुक्रवारी या रस्त्याचे उदघाटन केले होते.यावरून खासदार कोल्हे यांनी जोरदार टीका केली.
अधिक वाचा :
- ईडी, सीबीआय हा तर सरकार पाडण्यासाठीचा कार्यक्रम : ना. जयंत पाटील
- दहावी परिक्षेचा ऑनलाईन निकाल जाहीर, गुणांची लयलूट!
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मलाताई पानसरे, खेड बाजार समितीचे सभापती विनायक घुमटकर, जुन्नरचे संजय काळे, माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण चांभारे, अनिल बाबा राक्षे, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष कैलासराव सांडभोर,
माजी सभापती रामदास ठाकुर, दिलीप मेदगे, तिन्हे वाडीचे सरपंच अरुण थिगळे, तुकाईवाडीच्या सरपंच कुसुम भांबुरे, संध्याताई जाधव, साहेबराव गाढवे, प्रविण कोरडे, किशोर रोडे आदी यावेळी उपस्थित होते.
पोपट महाराज राक्षे,संदीप दरेकर यांनी या रस्त्यावर असलेले सांडभोरवाडी,झणझण स्थळ,तुकाईवाडी वळण धोकादायक असल्याचे सांगितले.
अधिक वाचा
- पुणे महापालिका : २३ गावांचा आराखडा करण्याचा अधिकार राज्य सरकारचा
- बँकेची फसवणूक : संशयीत आरोपीला बारामतीत अटक
शेती साठी रस्ता नाही. भुयारी मार्ग करा असे सुचवले. बैलगाडा शर्यती, विमानतळ,रेल्वे यावरून टीका करून माजी खासदार श्रेयासाठी धडपडत असल्याचे कोल्हे म्हणाले.
आढळराव चुकीचे सांगतात म्हणून खासदार संजय राऊत यांनी काही वेगळी भूमिका मांडली.
वस्तुस्थिती समोर आणुन दिल्यावर पुढे तसे झाले नाही, असेही कोल्हे यांनी सांगितले
आढळराव पाटील फक्त खेड तालुक्यातील विकास कामांना विरोध करतात.
मतभेद निर्माण करुन भांडणे लावतात.त्यांच्या कालच्या उद्घाटन कृतीचा निषेध करतो. असे आमदार दिलीप मोहिते-पाटील म्हणाले.
हे ही वाचा :