पुणे : काशेवाडीत घरगुती वादातून पत्नीचा खून

crime
crime
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा : मुलांना जेवायला देताना किरकिर घालणार्‍या पत्नीला लाथा बुक्यांनी मारहाण करून तिचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार काशेवाडी येथील अशोकनगर कॉलनी येथे सकाळी घडला. पोलिसांनी लागलीच घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रूग्णालयात पाठविला आहे.

आस्मा तौसीफ हवारी (35 रा. अशोकनगर, काशेवाडी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी खडक पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू असून, पती तौसिफ नुरहसन हवारी (37) याला ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तौसिफ हा केशकर्तनलायाच्या दुकानात कामाला आहे. तो त्याची पत्नी आस्मा आणि एक मुलगी आणि दोन मुलांसह काशेवाडीत राहण्यास आहे. मुलगी तेरा वर्षाची असून एक मुलगा दहा वर्षाचा तर लहान मुलगा सात वर्षाचा आहे. रविवारी रात्री मुलांना जेवण देताना पत्नी आस्मा किरकिर करते, या कारणातून त्याने तिला लाथा बुक्यांनी मारहाण केली. यावेळी तिच्या पोटावर देखील त्याने लाथा मारल्या. भांडणे निवळल्यानंतर सर्व रात्री झोपले. सोमवारी सकाळी तौसिफने पत्नी आस्मा हिला आवाज दिला असता तिच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. ती निपचीत पडली होती. तसेच तिचे शरीर ही थंड पडल्याचे त्याला आढळले.

त्याने लागलीच शेजारच्यांना बोलवले. खबर मिळताच काही वेळातच पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक तपासात रात्रीच्या पती पत्नीच्या भांडणात तौसीफने मारहाण केल्यानेच तिचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान आस्मा यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रूग्णालयात पाठविण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांच्या मार्गदर्शनाखाली खडक पोलिस करीत आहेत.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news