खंडणीसाठी अपहरण करणारे पोलिसांच्या जाळ्यात

खंडणीखोरांसह पुणे पोलिसांची टीम
खंडणीखोरांसह पुणे पोलिसांची टीम

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पोह्याची हातगाडी लावणार्‍या तरुणाचे सहा हजारांच्या खंडणीसाठी घरातून भरदिवसा अपहरण करणार्‍या टोळक्याला विश्रांतवाडी पोलिसांनी अटक केली आहे.

अभिजित दत्ता पाखरे (वय 24, रा. आकाश पार्क, धानोरी) आणि श्रीशैल्य सोमनाथ म्हस्के (वय 20, रा. प्रजासत्ताक कॉलनी, धानोरी) या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या दोन अल्पवयीन साथीदारांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत सिद्धार्थनगर धानोरी येथील 22 वर्षीय तरुणाने विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. हा प्रकार सिद्धार्थनगरमध्ये शनिवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडला होता.

दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करत असताना, पोलिस हवालदार दिपक चव्हण व प्रफुल्ल मोरे यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, खंडणी मागणारे आरोपी वाघोली केसनंद परिसरातील शिवनेरी हॉटेलच्या पाठीमागे थांबले आहेत. त्यानुसार गुन्हे निरीक्षक विजयकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

ही कामगिरी सहायक पोलिस निरीक्षक सचिन निकम, कर्मचारी दिपक चव्हाण, यशवंत किर्वे, प्रफुल्ल मोरे,शेखर खराडे,संदीप देवकाते,शिवाजी गोपनर यांच्या पथकाने केली. यावेळी पी फोर चे विशेष पोलिस अधिकारी राज राठोड यांनी तपास कामात पोलिसांना मदत केली.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news