दुसरा डोस देण्यात पुणे पिछाडीवर | पुढारी

दुसरा डोस देण्यात पुणे पिछाडीवर

  • पुण्यात 13 लाख लाभार्थ्यांना दुसरा डोस नाही

  • संपूर्ण जिल्ह्यात 82 लाख 60 जणांना मिळाला पहिला डोस

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुणे जिल्ह्यात लसीकरणाचा वेग वाढलेला आहे. मुंबईपाठोपाठ पुणे लसीकरणात राज्यात दुसर्‍या क्रमांकावर आहे. मात्र, त्याचबरोबर दुसर्‍या डोसच्या लाभार्थ्यांना वेळेत डोस देण्यात मागे पडले आहे. दुसर्‍या डोसच्या लाभार्थ्यांची संख्या वाढली असून, ती तब्बल 13 लाख 29 हजार इतकी झाली आहे.

अभिनेते नाना पाटेकर गदिमा पुरस्काराचे मानकरी

याबाबत आरोग्य सचिवांनी पुण्यासह सर्व जिल्ह्यांना आणि महापालिकांना पत्र पाठवले असून तातडीने दुसर्‍या डोसची संख्या वाढवण्यास सांगितले आहे. त्यासाठी दुसर्‍या डोसच्या लाभार्थ्यांना फोन करून बोलावून घ्या आणि त्यांना डोस द्या, असे आवाहन राज्याचे आरोग्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी प्रत्येक जिल्ह्यांना केले आहे.

फ्लेमिंगोनंतर उजनीत पट्टकदंब हंसांचे आगमन

पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीण मिळून 83 लाख 42 हजार लाभार्थी आहेत. त्यापैकी 82 लाख 60 जणांना पहिला डोस मिळाला आहे. तर, अजून 82 हजार 309 जणांना पहिला डोस मिळणे बाकी आहे. पहिला डोस दिलेल्यांपैकी 53 लाख 25 हजार जणांना दुसरा डोस मिळाला असून, अद्याप 30 लाख 17 हजार जणांना दुसरा डोस मिळणे बाकी आहे. त्यापैकी 5 डिसेंबरपर्यंत 13 लाख नागरिक डोस घेण्यास पात्र ठरले असून, त्यांची तारीख उलटून गेली आहे. तरी ते अद्याप न आल्याने त्याची दखल थेट आरोग्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी घेतली आहे.

बारामती बॅंकेसाठी राष्ट्रवादीचे पॅनेल जाहीर

डॉ. व्यास यांनी जिल्हा व महापालिका प्रशासनाला पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, आपल्या देशात 50 टक्के नागरिकांना दुसरा डोस मिळाला आहे. राज्यात सव्वाचार कोटी नागरिकांना दुसरा डोस मिळाला आहे. हे प्रमाण एकूण लोकसंख्येच्या तुलनेत 47 टक्के आहे. तर आपण देशाच्या लसीकरणाच्या वेगापेक्षा मागे पडलेलो आहोत. सध्या राज्यात कोविशिल्डचा दुसरा डोस घेण्यासाठी प्रतीक्षेतील लाभार्थीसंख्या 85 लाख इतकी आहे, तर कोव्हॅक्सिनचा डोस घेण्यासाठी साडेबारा लाख लोक प्रतीक्षेत आहेत, मात्र त्यांनी अद्याप डोस घेतलेला नाही.

LPG Cylinder : घरगुती सिलिंडर वजनात बदल करण्‍याचा केंद्र सरकारचा विचार

दुसर्‍या डोसच्या लाभार्थ्यांना फोन करून बोलावून घ्या

आपल्याकडे लसीकरण लाभार्थ्यांचे मोबाईल नंबर आहेत. त्यांना फोन करून बोलावून घ्या. काही जिल्ह्यांनी असा प्रयोग राबवला असून, तो फायदेशीर ठरला आहे. ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर दुसर्‍या डोसच्या लाभार्थ्यांना वेळेत डोस देणे आवशक आहे, असे डॉ. व्यास यांनी म्हटले आहे.

Panna Diamond Mining : ‘येथे’ टनभर मातीत मिळतात ५० लाखांचे हिरे

जिल्हा       लाभार्थी
पुणे           12,18,344
मुंबई         6,62,368
कोल्हापूर   5,22,067
ठाणे          5,10,168
नागपूर       4,67,119

PepsiCo : शेतकऱ्यांनी जिंकली बटाट्याची लढाई! पेप्सिकोला तगडा झटका, काय आहे नेमकं प्रकरण?

Back to top button