Rahul Gandhi : आंदोलनादरम्यान ७०० शेतकऱ्यांचा मृत्यू, सरकारकडे डाटा का नाही?; राहुल गांधींचा सवाल | पुढारी

Rahul Gandhi : आंदोलनादरम्यान ७०० शेतकऱ्यांचा मृत्यू, सरकारकडे डाटा का नाही?; राहुल गांधींचा सवाल

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

शेतकरी प्रश्नी पुन्हा एकदा काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. शेतकरी आंदोलनादरम्यान सुमारे ७०० शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. पंतप्रधानांनी देशाची आणि देशातील शेतकऱ्यांची माफी मागितली. त्यांनी चूक झाल्याचे मान्य केले. पण केंद्रीय कृषी मंत्र्यांकडे आंदोलनादरम्यान किती शेतकऱ्यांचा मृत्यू झाला असा सवाल केला होता. पण त्यांच्याकडे याची माहिती नाही, असे सांगत राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. ते लोकसभेत बोलत होते.

आंदोलनादरम्यान मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई आणि नोकरी द्यायला हवी, अशी मागणी राहुल गांधी यांनी लोकसभेत केली. पंजाब सरकारने ४०० शेतकऱ्यांना प्रत्येकी ५ लाखांप्रमाणे नुकसान भरपाई दिली आहे; त्यापैकी १५२ जणांना नोकऱ्याही दिल्या. माझ्याकडे मृत शेतकऱ्यांची यादी आहे. आम्ही हरियाणातील ७० शेतकऱ्यांची दुसरी यादी तयार केली आहे. पण तुमचे सरकार म्हणते की शेतकऱ्यांची नावे नाहीत, असे राहुल गांधी यांनी लोकसभेत निदर्शनास आणून दिले. त्यांनी लोकसभेत शेतकऱ्यांची यादी दाखवत केंद्र सरकारच्या कारभारवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

शेतकऱ्यांना त्यांचे हक्क मिळायला हवेत. त्यांना नुकसान भरपाई सोबतच नोकऱ्या मिळायला हव्यात, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी उपस्थित मुद्यांवर सरकारडून उत्तर दिले नसल्याबद्दल काँग्रेस खासदारांनी सभात्याग केला.
शेतकरी प्रश्नांवर सरकार काहीच का उत्तर देत नाही, असा सवालही खासदार शशी थरुर यांनी उपस्थित केला.

दरम्यान, राज्यसभेत १२ सदस्यांच्या निलंबनाच्या मुद्यावरुन गदारोळ झाला. सभागृहाचे कामकाज सुरु झाल्यानंतर काही वेळातच गोंधळ वाढल्याने कामकाज स्थगित करण्यात आले.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : जेव्हा शाहू महाराजांनी बाबासाहेबांना 750 रुपये दिले | Shahu Maharaj and dr.Babasaheb Ambedkar

Back to top button