पुणे : पार्टीच्या बहाण्याने जंगलात नेऊन तरुणीवर बलात्कार | पुढारी

पुणे : पार्टीच्या बहाण्याने जंगलात नेऊन तरुणीवर बलात्कार

पुणे : पुढारी वृत्तसेवा : वाढदिवसाची पार्टी करण्याच्या बहाण्याने तळजाईच्या जंगलात नेऊन, तेथे मद्यप्राशन केल्यानंतर तरुणीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी शुभम सिताराम शिंदे (वय 19, रा. सह्याद्रीनगर, धनकवडी) या तरुणाला अटक केली आहे. याप्रकरणी कात्रज येथील एका 22 वर्षाच्या तरुणीने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. शुभम याने फिर्यादी तरुणीला 5 डिसेबर रोजी वाढदिवसाची पार्टी आहे, तू तळजाई शेवटचा बसथांबा येथे ये, असे सांगितले. त्यानुसार ती सायंकाळी 5 वाजता तेथे आली. आरोपी त्याचा एक मित्र व फिर्यादी यांना तळजाई येथील जंगलात नेले. तेथे ते दोन ते अडीच तास दारु पित बसले होते. फिर्यादी तरुणीला थंडी वाजत असल्याने ती कडेला झोपली असताना शुभम याने तिच्यावर बलात्कार केला. पुढील तपास सहकारनगर पोलिस करत आहेत.

हेही वाचा

अभिनेते नाना पाटेकर गदिमा पुरस्काराचे मानकरी

फ्लेमिंगोनंतर उजनीत पट्टकदंब हंसांचे आगमन

LPG Cylinder : घरगुती सिलिंडर वजनात बदल करण्‍याचा केंद्र सरकारचा विचार

बारामती बॅंकेसाठी राष्ट्रवादीचे पॅनेल जाहीर

दुसरा डोस देण्यात पुणे पिछाडीवर

Yuvraj Singh-MS Dhoni: जब मिल बैठे दो यार! युवराज-एमएस धोनीमध्ये पॅचअप

 

Back to top button