दिशा परमार हिच्या हातावर खुलली मेंहदी | पुढारी

दिशा परमार हिच्या हातावर खुलली मेंहदी

मुंबई ; पुढारी ऑनलाईन: टीव्ही शो ‘बिग बॉस १४’ फेम राहुल वैद्य आणि त्याची मैत्रीण अभिनेत्री दिशा परमार लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे. दिशा परमार हिने  प्री-वेडिंग सोहळ्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

राहुल वैद्य आणि अभिनेत्री दिशा परमार दोघेजण १६ जुलै २१२१ रोजी लग्न बंधनात अडकणार आहेत.

अधिक वाचा 

दिशाच्या हातावर खुलली मेंहदी

दिशा परमार आणि राहुल वैद्य दोघांनी लग्नाआधीचा एक व्हिडिओ आपल्या इंन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओत दिशा आणि राहुल दोघेही आनंदीत असून दिशाच्या हातावर मेंहदी दिसत आहे. दिशा बसलेल्या खुर्चीवर ‘दुल्हनिया’ असे शब्द रचना केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by DP (@dishaparmar)

याशिवाय आणखी एका व्हिडिओत दिशा आणि राहुल दोघेजण बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या ‘मेहंदी लगा के रखना’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत.

अधिक वाचा 

अली गोनी, तोशी सबरी, मिका सिंग आणि विंदू दारा सिंह यांच्यासारखे सेलिब्रिटी संगीत सोहळ्यात सहभागी झाले आहेत.

हा व्हिडिओ व्हायरल होताच चाहत्यांनी कॉमेंन्टस करून दोघांना लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. लग्न सोहळ्यासाठी दोन्ही कुंटूबियांनी जय्यत तयारी केली आहे.

अधिक वाचा 

या विवाह सोहळ्यात त्यांनी जवळचे नातेवाईक आणि मित्रमंडळी मिळून ५० जणांनाच आमंत्रित केले आहेत. या आमंत्रणासोबत त्यांनी आम्ही तुम्हाला आमच्या खास दिवसाचा एक भाग बनवू इच्छितो आणि तुमचा आशीर्वाद घेऊ इच्छितो. तुम्हाला भेटायला उत्सुक आहोत’ असा संदेश लिहिला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by DP (@dishaparmar)

राहुल आणि दिशाने ६ जुलै २०२१ रोजी आपल्या लग्नाची घोषणा केली होती, यानंतर लग्नाची तयारी सुरू झाली.

हेही वाचलंत का? 

Breaking News : दहावीचा उद्या दुपारी १ वाजता निकाल जाहीर होणार

पिंपरी : ‘गरोदर प्रेयसीचा मी गळा दाबला, मला दहा वर्षे झोप लागत नाही’; १० वर्षांपूर्वीचा खून असा आला उघडकीला

‘कोरोनामुक्‍तां’पेक्षा नवे रुग्‍ण अधिक : रुग्‍णवाढीने चिंता कायम

पाहा :”ब्रा आणि बुब्ज वर मी बोलले कारण…” | हेमांगी कवी Exclusive

Back to top button