लोणंद (सातारा); पुढारी वृत्तसेवा: लोणंद येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील बकरी-बोकड बाजारात रेकॉर्ड ब्रेक गर्दी झाली. बुधवार (दि.२१) रोजी होणाऱ्या बकरी ईदच्या सणाच्या पार्श्वभूमीवर ही रेकॉर्ड ब्रेक गर्दी झाली हाेती.
आजच्या बाजारात सुमारे तीन ते चार कोटी रुपयांची उलाढाल झाली. ही विक्रमी उलाढाल असल्याचा अंदाज व्यक्त हाेत आहे.
अधिक वाचा
लोणंद बाजार समितीच्या परिसरातील बकरी, बोकड आणि जनावरे बाजारात गुरूवारी खूपच गर्दी झाली. पहाटे पाच वाजल्यापासून बाजार आवारात दुचाकी, चार चाकी आणि ट्रकमधुन शेळी, मेंढी, बकरी व बोकड या जनावऱ्यांची आवक होत होती.
बाजारात बकरी व बोकडांची सुमारे पाच, दहा, पंधरा ते वीस हजारांपर्यत किंमत होती. यावेळी एका बोकडाची किंमत एक लाखापेक्षाहून अधिक होती.
अधिक वाचा
आजच्या बाजारात सुमारे तीन ते चार कोटींची उलाढाल होणार असल्याचे लोणंद बाजार समितीचे सभापती राजेंद्र तांबे यांनी सांगितले.
बाजारात बकरी व बोकड खरेदीसाठी कर्नाटक, गोवा, राज्यासह हुबळी, घारवाड, बेंगलोर, कोकणातील महाड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सांगली आदी भागातील सुमारे पंधरा ते वीस हजारांपर्यत खरेदीदार आले होते. तर वाहनांची संख्याही मोठी होती.
अधिक वाचा
बकरी ईदच्या निमित्ताने बाजारात सुमारे बकरी व बोकड खरेदी- विक्री उलाढालीतून मोठा सेस बाजार समितीला जमा होईल असे सचिव विठ्ठल सपकाळ यांनी सांगितले.
बाजारात मोठया संख्येने खरेदीदार आणि विक्रीदार आल्याने या परिसराला यात्रेचे स्वरूप आले होते.
हेही वाचलंत का?
पाहा : 200 वर्षे जुने बंगले असणारं मुंबईतलं म्हातारपाखाडी