काळजी घ्या ! पुण्याचा पारा चढाच; रात्रीचा उकाडा कायम राहणार | पुढारी

काळजी घ्या ! पुण्याचा पारा चढाच; रात्रीचा उकाडा कायम राहणार

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुणे शहरासह जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला उन्हाचा तडाखा तसेच रात्रीचा उकाडा कायम असून, पुढील काही दिवस हवामान कोरडे राहणार असल्यामुळे उन्हाचा तडाखा कायम राहणार आहे. दरम्यान, शुक्रवारी शहरात लोहगाव, चिंचवड, लवळे, मगरपट्टा, एनडीए, कोरेगाव पार्क या भागाचा कमाल तापमानाचा पारा 40 अंश सेल्सिअसच्या पुढेच नोंदला गेला.

पुणे शहर आणि परिसरात एप्रिल महिन्याच्या पहिल्या टप्प्यापासून उन्हाचा तडाखा वाढत आहे. त्यामुळे दिवसभर उन्हाच्या तीव्र झळा, तर रात्रीचा उकाडा यामुळे नागरिक चांगलेच हैराण झाले आहेत. उन्हाच्या तीव्र झळांमुळे शहरातील वाहतूक दुपारच्यावेळी काहीशी कमी झालेली दिसत आहे. उन्हाच्या तडाख्यापासून सुटका व्हावी यासाठी नागरिकांचा थंड पेयांकडे कल असल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा

Back to top button