दिव्यांग, लहान मुले, महिला, कामगारांची काळजी घ्या; आरोग्य विभागाला सतर्क राहण्याच्या सूचना | पुढारी

दिव्यांग, लहान मुले, महिला, कामगारांची काळजी घ्या; आरोग्य विभागाला सतर्क राहण्याच्या सूचना

पुणे : पुढारी वृत्तसेवा : एप्रिल महिना संपत आला असून, मे महिना सुरू होत आहे. यात उष्णतेची लाट अतितीव्र होत असून, दिव्यांग, लहान मुले, महिला यांची काळजी घ्या, असा इशारा हवामान विभागाने राज्य शासनाला दिल्याने सर्वच जिल्हाधिकारी, महापालिका आणि ग्रामपंचायत स्तरावर प्रशासनाने तत्काळ तो प्रसारित केला आहे. या इशाऱ्यात म्हटले आहे, की राज्यात सर्वत्र उष्णतेची लाट तीव्र होत आहे. त्यामुळे आरोग्यविषयी गंभीर समस्या निर्माण होण्याचा धोका आहे. तो लक्षात घेता, प्रशासकीय विभाग, महानगरपालिका, ग्रामपंचायत येथील आरोग्य विभागासह आपत्ती व्यवस्थापन विभागाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

या आहेत सूचना :

  • रेल्वे, बस, रिक्षा, टॅक्सी स्थानकांवर पिण्याच्या पाण्याची सोय करा
  • या ठिकाणी पुरेसे पंखे, कुलर यांचीही व्यवस्था करावी.
  • उष्माघाताची काळजी घेण्यासाठी आरोग्य पथक तैनात ठेवा
  • बाजार, मॉल्स या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करा
  • सार्वजनिक उद्याने दुपारी 12 ते 4 खुली ठेवावीत जेणकरून लोक तेथे थांबू शकतील.
  • आरोग्य केंद्रात उष्णतेच्या लाटेची माहिती लावा.
  • विद्यार्थांनी मैदानावरील व्यायाम कमी करावेत. दुपारी 1 ते 4 व्यायाम टाळावा.
  • महाविद्यालयांनी पंखे, कुलंर सुरू आहेत का, याची खात्री करूनच परीक्षा घ्याव्यात.
  • सर्वच कामाच्या ठिकाणी गार पाण्याची व्यवस्था आहे का, याची खात्री करा.
  • – बांधकामाच्या ठिकाणी पाणी आणि प्रथमोपचार किट ठेवा

हेही वाचा

Back to top button