Mephedrone drug case : फरार तस्कराला बेड्या; गुन्हे शाखेची कारवाई | पुढारी

Mephedrone drug case : फरार तस्कराला बेड्या; गुन्हे शाखेची कारवाई

पुणे : पुढारी वृत्तसेवा : मेफेड्रॉन ड्रगतस्करी प्रकरणात गुन्हे शाखेच्या हाती बडा तस्कर लागला आहे. तो आईला भेटण्यासाठी आल्याचे समाजात पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून 10 लाख रुपयांचे 51 ग्रॅम एमडी जप्त करण्यात आले आहे. मागील महिनाभरापासून संबंधित आरोपी पसार झाला होता. याप्रकरणी पुणे गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला बेड्या ठोकल्या आहेत. शोएब सईद शेख (रा. कोंढवा) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

शहरातील मध्य भागात मेफेड्रॉन तस्करी करणार्‍या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेने 19 फेब—ुवारीला अटक केली होती. याप्रकरणी पोलिसांनी यापूर्वी 13 जणांना अटक केली. मेफेड्रॉन मास्टर माइंड संदीप धुनिया, अशोक मंडल, वीरेंद्रसिंग बसोया हे फरार असून, त्यांचा शोध सुरू आहे. ही कामगिरी अपर आयुक्त शैलेश बलकवडे, पोलिस उपायुक्त अमोल झेंडे, सहायक पोलिस आयुक्त सतीश गोवेकर, सहायक पोलिस आयुक्त सुनील तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली.

आईला भेटायला आला अन् जाळ्यात अडकला

मेफेड्रोन तस्कर शोएब शेख आईला भेटण्यासाठी आल्याची माहिती पुणे गुन्हे शाखेला मिळाली . त्यानुसार त्याला गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. गेल्या एक महिन्यापासून तो जळगाव, पंढरपूर, शिर्डी या ठिकाणी फिरत असल्याचे उघडकीस आले आहे. दरम्यान, तो हैदर शेख याच्यासोबत माल पुरविणे, मेफेड्रोन गोडाऊनमध्ये ठेवणे, तेथून पुढे पाठविणे, असे काम करीत होता.

हेही वाचा

Back to top button