जळगाव : पुढारी वृत्तसेवा
आईच्या नावावर घर व प्लॉट असल्याने आईचे नाव कमी करून तक्रारदार यांचे फेरफार नाव लावण्यासाठी ग्रामसेवक व शिपाई यांना सहा हजाराची लाच घेताना अँटी करप्शन ब्युरोने रंगेहाथ अटक केली आहे.
मुक्ताईनगर तालुक्यातील राजुरा येथे तक्रारदाराच्या आईच्या नावे घर आणि प्लॉट असून त्यावरील आईचे नाव कमी करून तक्रारदाराचे नाव लावण्यासाठी तक्रारदाराने राजुर ग्रामपंचायतकडे अर्ज केला होता. राजुर येथील ग्रामसेवक मनोज सूर्यकांत घोडके यांनी त्याबदल्यात अकरा हजार रुपयाची मागणी केली होती. त्यानंतर ग्रामसेवक यांच्या सांगण्यावरून ग्रामपंचायत शिपाई सचिन अशोक भोलाणकर याने राजुरा ग्रामपंचायत येथे सहायक फौजदार दिनेशसिंग पाटील, पोलीस नाईक बाळू मराठे, पोलीस कॉन्सटेबल प्रणेश ठाकूर यांनी सापळा लावला. यावेळी सहा हजार रुपयाची लाच घेताना शिपाई याला रंगेहाथ पकडण्यात आले असून ग्रामसेवकासह शिपाई अटक करण्यात आली असून मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.