पुणे : पुढारी वृत्तसेवा : मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच उष्णतेची लाट जाणवू लागली आहे. त्यामुळे उष्माघाताच्या त्रासाची शक्यताही वाढली आहे. गेल्या 15 दिवसांत राज्यात 13 रुग्णांना उष्माघाताचा त्रास झाला आहे. यामध्ये सर्वाधिक रुग्ण बीड येथील आहेत. तेथील 4 रुग्णांना उष्माघाताचा त्रास झाला आहे. रायगडमध्ये 2, तर अहमदनगर, अकोला, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, धुळे, सातारा येथे प्रत्येकी 1 रुग्णाची नोंद झाली आहे.