पुणे क्राईम : तरुणाईला ’भाईगिरीचा’ संसर्ग? उदयोन्मुख दादा, भाऊंच्या मुसक्या आवळण्याचे आव्हान | पुढारी

पुणे क्राईम : तरुणाईला ’भाईगिरीचा’ संसर्ग? उदयोन्मुख दादा, भाऊंच्या मुसक्या आवळण्याचे आव्हान

पुणे; अशोक मोराळे : पुणे क्राईम सध्या राज्यात चर्चेचा विषय ठरत आहे. गुन्हेगारांना हिरोच्या रुपात आपला आदर्श मानणारी तरुणांची एक पिढीच समाजात निर्माण झाली आहे.

ही पिढी स्वतःच्या छोट्या मोठ्या गुन्हेगारी टोळ्या निर्माण करून पुण्यातील वेगवेगळ्या परिसरात दहशत माजवण्याचा प्रयत्न करत आहे.

गुन्ह्यात अडकल्यानंतर बडे गुन्हेगार अशा तरुणांना आश्रय अन् पैसा पुरवतात. एकदा का तो सराईत झाला की त्याचा पुढे सोईस्कर वापर केला जातो.

पुढे त्यातूनच जन्म होतो तो कथीत भाई..दादा..अन्..भाऊंचा..!

दरम्यान, मागील काही दिवसात पुणे क्राईम कव्हर करताना, गुन्हेगारी घटनांचा आढावा घेत असताना. विविध गुन्ह्यात तरुणांचा सहभाग अधिक असल्याचे दिसते.

त्यामुळे शहरातील तरुणाईला भाईगिरीचा संसर्ग तर जडत नाही ना? असा सवाल निर्माण होतो आहे.

अधिक वाचा : 

टोळ्यांचे दादा व पंटर लोकांचा वस्तीत असलेला दबदबा, कमी कालावधीत आलेल्या ऐशोआरामाच्या गोष्टी, यामुळे अनेक तरुण मुले त्यांना आपला आदर्श मानत असल्याचे चित्र आहे.

त्यांच्या एका शब्दावर पुढील मागचा विचार न करता सांगतील ती कामे ही मुले करतात.

गुन्हेगारी विश्वात जेवढे गुन्हे जास्त तेवढे भाईंचे परिसरात वजन असा कयास बांधला जातो. ही गोष्ट तरुणाई आणि सामाजिक स्वास्थसाठी नक्कीच लाभदायक नाही.

पोलिसांच्या प्रभावी उपायोनामुळे सराईत टोळ्यांची गुन्हेगारी नियंत्रणात आली आहे. मात्र गल्ली बोळातील किशोरवयीन मुलांच्या टोळ्यामुळे पोलिसांची डोकेदुखी वाढल्याचे दिसून येते.

अधिक वाचा : 

शहरात मागील काही दिवसापासून कोठे ना कोठे तरुणांकडून हाणाारी, तोडफोडीचे किंवा दहशत पसरविण्याचे गुन्हे घडत आहेत. एवढेच नाही तर किरकोळ कारणातून खून आणि खूनाचे प्रयत्न अशा घटना वाढल्या आहेत.

शिक्षणाचा अभाव, आर्थिक परिस्थिती, पालकांचे दुर्लक्ष तसेच लहान वयात लागलेले व्यसन ही तरुणाई गुन्हेगारीकडे आकर्षित होण्याची कारणे असल्याचे जाणकार सांगतात.

भाईची क्रेझ अन् वर्चस्ववादातून संघर्ष अटळ

तरुणाई समाजातील चांगल्या वाईट गोष्टीचे अनुकरण करत असते. त्याचा परिणाम त्यांच्या मनावर होत असतो. गल्लीत सर्वात जास्त मान सन्मान भाई लोकांना मिळत असतो. परिसरातील सर्व लोकं त्यांना घाबरतं असतात.

निवडणूकीच्यावेळी नेते मंडळी देखील त्यांच्या हातात हात घालत असतात. ही वस्तूस्थीती त्यांनी पाहिलेली व अनुभवलेली असते.

शिक्षणाचा अभाव, लहान वयात सोडावे लागलेले शिक्षण, व्यसनाधीनता, पालकांचे दुर्लक्ष, घरात कोणाचा धाक नसने ही कारणे तरुणांना गुन्हेगारीत खेचतात.

पुढे हेच तरुण आपली टोळी निर्माण करतात. दिवसभर टवाळगिरी आणि व्यसनासाठी छोट्या-मोट्या चोर्‍या किंवा लुटालूट करणे असा प्रवास सुरू होतो. पुढे परिसरात एखादी टोळी निर्माण झाली तर वर्चस्ववादातून दोघांत संघर्ष ठरलेला असतो.

नजरेला नजर भिडली, किंवा धक्का लागला तरी हाणामारी सुरू होते. त्यामध्ये दगड, कोयता, बांबू, विटांचा वापर केला जातो. त्यातूनच दहशत निर्माण करण्यासाठी वाहनांची तोडफोड व जाळपोळीसारखे प्रकार केले जातात.

या घटना अधोरेखीत करतात?

मागील काही दिवपासूर्वी वानवडी परिसरात सिगारेट दिली नाही म्हणून दोघांनी टपरी चालकाच्या खूनाचा प्रयत्न केला. आम्ही येथील भाई आहोत तू दररोज आम्हाला मोफत सिगारेट द्यायची. असे म्हणत परिसरात आपली दहशत निर्माण व्हावी म्हणून पेट्रोल टाकून घर पेटवून दिले.

कोंढव्यातील मिठानगर येथे सराईत गुन्हेगाराच्या टोळक्याने मला तू भीत नाही का म्हणत एका व्यक्तीला लाकडी दांडक्याने मारहाण करून वस्ती पेटवून देण्याची धमकी दिली.

पुणे क्राईम आणि त्याची शुल्लक कारणे

बिबवेवाडी येथील ओटा स्किम येथे सराईत गुन्हेगाराचा दहा जणांच्या टोळक्याने खून केला. त्यानंतर त्याच्या अंत्ययात्रेला एकत्र येऊन दुचाकी रॅली काढली.

सिंहगड रोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत देखील रायकरमळा येथे टोळक्याने दोघांवर प्राणघातक हल्ला केला. त्यात एकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला.

अधिक वाचा : 

या घटनेला थोडासा कालावधी लोटतो आहे ना तो पर्यंतच एका तरुणावर टोळक्याने कोयत्याने हल्ला चढवला.

वेळीच तो शेजारच्या घरात शिरल्यामुळे कसाबसा वाचला.

काही दिवसापूर्वी जनता वसाहतीचा भाई कोण यावरून दोन टोळक्यात कोयत्याने हल्ला करत राडा झाला होता.

गंजपेठेत एकमेकांकडे पाहण्याच्या कारणातून टोळक्याने एका तरुणार कोयत्याने हल्ला केला. यावेळी परिसरातील वाहनांची देखील तोडफोड करण्यात आली. असे अनेक प्रकार शहरात घडत आहेत.

हेही वाचले का?

पाहा : पुणेकर शिल्पा नाईक यांच्या टेरेसवरील शेतीचा व्हिडिओ 

Back to top button