बसस्टॉपवर झोपलेल्या प्रवाशाचा मर्डर, पुणे स्टेशन परिसरातील घटना | पुढारी

बसस्टॉपवर झोपलेल्या प्रवाशाचा मर्डर, पुणे स्टेशन परिसरातील घटना

पुणे : पुढारी वृत्तसेवा : मुंबईला जाण्यासाठी बसस्टॉपवर झोपलेल्या एका प्रवाशाचा मर्डर झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. संजय बाबु कदम (वय ३५, रा. घाटकोपर) असे मर्डर झालेल्याचे नाव आहे. तो मूळचा लातूर जिल्ह्यातील रहिवाशी असून अनेक दिवसांपासून मुंबईत स्थायिक आहे.

अधिक वाचा : 

चोरीच्या उद्देशाने हा खून झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक संशय आहे. बंडगार्डन पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. संजय कदम हे शिरुर तालुक्यातील आंबेगाव येथे एका हॉटेलमध्ये काम करत होते.

ते सध्या घाटकोपर येथील परेरावाडी येथे राहत होते. घरी जाण्यासाठी सोमवारी रात्री पुण्यात आले होते. परंतु, गावी जाण्यासाठी बस नसल्याने ते रात्री साधू वासवाणी चौकातून अंलकार चित्रपटगृहाकडे जाणार्‍या रस्त्यावरील विजय सेल्स या दुकानासमोरील बस स्टॉपवर झोपले होते.

अधिक वाचा : 

मध्यरात्रीनंतर कोणीतरी त्यांच्या डोक्यात व डोळ्यावर तीक्ष्ण हत्याने वार करुन त्यांचा खून केला. ही बाब मंगळवारी सकाळी उघडकीस आली.

याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत गवारी यांनी सांगितले की, संजय कदम याच्या खिशामध्ये एका मोबाईल नंबर आढळून आला होता. त्यावर संपर्क केल्यानंतर त्यांची ओळख पटली. आरोपींचा शोध घेतला जात आहे.

अधिक वाचा : 

पुणे स्टेशन भागात रात्री अपरात्री बाहेरगावाहून येणार्‍या प्रवाशांना लुटण्याचे प्रकार नेहमीच घडत असतात. हत्यारांचा धाक दाखवून प्रवाशांना लुटले जाते. कदम यांचा खुनही चोरीच्या उद्देशाने झाला असल्याचा संशय आहे.

हे ही वाचा : 

हे ही पाहा :

Back to top button