सैन्‍यदलास भाजीपाला पुरवणारा निघाला 'आयएसआय'चा हेर | पुढारी

सैन्‍यदलास भाजीपाला पुरवणारा निघाला 'आयएसआय'चा हेर

नवी दिल्‍ली ; पुढारी ऑनलाईन : सैन्‍यदलास भाजीपाला पुरवणाराच पाकिस्‍तानची गुप्‍तहेर संघटना ‘आयएसआय’चा हेर असल्‍याची धक्‍कादायक माहिती उजेडात आली आहे. ‘आयएसआय’चा हेर असणार्‍या आरोपीच्‍या दिल्‍ली पोलिसांनी मुसक्‍या आवळल्‍या आहेत. हबीब खान (वय ४८) असे त्‍याचे नाव आहे.

अधिक वाचा 

दिल्‍ली पोलिसांनी हबीब खान याला राजस्‍थानमधील पोखरण येथे अटक केली. तो मूळचा बीकानेरचा रहिवासी असल्‍याचे सूत्रांनी सांगितले.

हबीब खान हा ‘आयएसआय’साठी हेरगिरी करत होता. तो भारतीय सैन्‍यदलाचे गोपनीय कागदपत्रे पाकिस्‍तानला पुरवत होता. त्‍याच्‍याकडे पोखरणमधील भारतीय सैन्‍यदलाच्‍या अधिकार्‍याची गोपनीय कागदपत्रे जप्‍त करण्‍यात आली आहेत. प्राथमिक चौकशीत त्‍याच्‍याविरोधात ठोस पुरावे मिळाले असल्‍याची माहिती दिल्‍ली पोलिसांच्‍या गुन्‍हे अन्‍वेषण विभागाच्‍या सूत्रांनी दिली.

अधिक वाचा 

आयएसआय एजंट हबीब खान याला सैन्‍य दलातील अन्‍य कोणाची मदत मिळत होती का, याचा तपास सुरु आहे.
हबीब खान हा पोखरणमध्‍ये वास्‍तव्‍यास होता. येथील भारतीय सैन्‍यदलाच्‍या ‘इंदिरा रसोई’ ला भाजीपाला पुरवठा करण्‍याचा ठेका त्‍याच्‍याकडे होता. याचा फायदा घेत त्‍याने कार्यालयातही घुसखोरी केली. काही महिन्‍यांपूर्वी त्‍याच्‍या हालचालीवरुन सैन्‍यदलास त्‍याच्‍यावर संशय आला हाेता.

अधिक वाचा 

दिल्‍ली पोलिसांनी मंगळवारीहबीब खानला पोखरण येथे अटक केली. त्‍याच्‍याकडे भारतीय सैन्‍यदलाचे गोपनीय कागदपत्रे सापडली. ही कागदपत्रे तो आयएसआयला देत होता. या मोबदल्‍यात त्‍याला पैसे मिळत होते, अशी कबुली त्‍याने दिली आहे.

हेरगिरीची मोठा खुलासा होण्‍याची शक्‍यता

हबीब याने चौकशीत त्‍याला मदत करणार्‍या दोन ते तीन लोकांची नावे घेतली आहे. हेरगिरी करणारी टोळी असून हबीब खान हा यातील एक सदस्‍य आहे, अशी माहिती दिल्‍ली पोलिसांच्‍या सूत्रांनी दिली.

या प्रकरणाचा सखोल तपास सुरु आहे. सर्व माहिती व अन्‍य आरोपी हाती लागल्‍यानंतरच माहिती दिली जाण्‍याची शक्‍यता आहे. हबीब खानला अटक केल्‍याने हेरगिरीची मोठा खुलासा होण्‍याची शक्‍यता व्‍यक्‍त केली जात आहे.

हेही वाचलं का? 

पहा व्‍हिडिओ : “ब्रा आणि बुब्ज वर मी बोलले कारण…” | हेमांगी कवी Exclusive

Back to top button