पुणे : सरकारी वकील लाच घेताना सापडला; | पुढारी

पुणे : सरकारी वकील लाच घेताना सापडला;

पुणे; पुढारी वृत्तसेवा : सरकारी वकील जामीन मिळवण्याच्या कामात साडेतीन हजाराची लाच घेताना सापडला आहे. खेड राजगुरूनगर विशेष न्यायालयातील एक सरकारी अतिरिक्त वकील (अभियोक्ता) रंगेहाथ सापडला. लाचलुचपत विभागाच्या पथकाने ही कारवाई केली.

देवेंद्र मधुकर सोन्नीस (वय.५७) असे वकिलाचे नाव आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

अधिक वाचा :

तक्रारदार यांचे अशिल यांच्या जामीन अर्जावर सुनावणीसाठी मदत हरकत न घेणे व जामीन मिळवण्यासाठी मदत करणे यासाठी सोन्नीस याने पाच हजाराच्या लाचेची मागणी केली होती.

त्यातील १५०० रुपये देखील त्याने या अगोदर स्वीकारले आहेत. दरम्यान तक्रारदार यांनी याबाबत एसीबीकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार तक्रारीची खातरजमा केली असता, सोन्नीस याने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.

त्यानंतर पथकाने सापळा रचून सोन्नीस याला राहिलेले ३ हजार ५०० रुपयांची लाच घेताना पकडले.

हेही वाचले का?

पाहा व्हिडिओ : कोल्हापुरातील विठ्ठलाला प्रवासी का म्हणतात?

Back to top button