भोर विधानसभेतील 150 जणांचा शिवसेनेत प्रवेश | पुढारी

भोर विधानसभेतील 150 जणांचा शिवसेनेत प्रवेश

पौड : पुढारी वृत्तसेवा :  भोर विधानसभा मतदारसंघातील 150 पदाधिकार्‍यांनी जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला. मुंबई येथील बाळासाहेब भवनमध्ये शिवसेनेचे प्रतोद भरत गोगावले व माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. टेमघर ग्रामपंचायतीचे सरपंच सचिन मरगळे, चालेचे सरपंच दीपक चाळेकर, ठाकरे गटाचे विभाग संघटक शांताराम साठे, रेणुका मरगळे, मनोज टेमघरे, टेमघर ग्रामपंचायतीचे सदस्य अनंता मरगळे, विमल मरगळे, मुळशी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाबासाहेब साखरे, स्वप्निल साखरे, ओमकार साखरे, आकाश देशमुख, टेमघर येथील ठाकरे गटाचे शाखाप्रमुख लक्ष्मण मरगळे, वेल्हे तालुक्यातील संकेत खाडे, शंकर तळेकर, अक्षय कोडीतकर, मोहन वीर, प्रशांत तळेकर, संतोष चिकणे, दिलीप तळेकर आदींचा त्यात समावेश आहे.

या वेळी महिला आघाडी जिल्हाप्रमुख कांताताई पांढरे, उपजिल्हाप्रमुख संतोष तोंडे, तालुकाप्रमुख दीपक करंजावणे, भोर विधानसभाप्रमुख गणेश मसुरकर, गणेश निगडे, भोर तालुकाप्रमुख दशरथ जाधव, वेल्हा तालुकाप्रमुख सुनील शेंडकर, उपतालुकाप्रमुख विकास खैरे, अक्षय अमराळे, समीर बारमुख, समीर जोरी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

विधानसभेसाठी शिवसैनिकांनीच आता कंबर कसल्याने येत्या काळात शिवसेनेला त्याचा मोठा फायदा होणार आहे. एकनाथ शिंदे यांनी घेतलेले महाराष्ट्राच्या हिताचे धाडसी निर्णय घराघरांत पोचहविण्यासाठी आमची टीम आता नव्या जोमाने कार्यरत झाली आहे. मुळशीतील विकासकामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याने तालुक्यातील पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करीत आहेत.
                                            बाळासाहेब चांदेरे, शिवसेना जिल्हाप्रमुख

Back to top button