शिक्षक भरतीसाठी 21 हजार 678 जागा; जाणून घ्या तारीख | पुढारी

शिक्षक भरतीसाठी 21 हजार 678 जागा; जाणून घ्या तारीख

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे राबविल्या जाणार्‍या शिक्षक भरती प्रक्रियेला अखेर मुहूर्त सापडला आहे. सोमवारी (दि.5) शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेत असणार्‍या उमेदवारांसाठी 21 हजार 678 जागांच्या जाहिराती उपलब्ध केल्या आहेत. यामध्ये मुलाखतीशिवाय 16 हजार 799 तर मुलाखतीसह 4 हजार 879 पदे भरण्यात येणार असल्याचे शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी स्पष्ट केले. शालेय शिक्षण विभागातर्फे राबविल्या जाणार्‍या शिक्षक भरती प्रक्रियेला खूप विलंब झाला आहे.

शिक्षकांची आंतरजिल्हा बदली, मराठी इंग्रजी माध्यम वाद, केंद्र शाळेवर साधनव्यक्ती नियुक्ती आदी कारणांमुळे भरती प्रक्रिया लांबली होती. पवित्र पोर्टलवर जाहिरातीची कार्यवाही पूर्ण केल्यानंतर 34 जिल्हा परिषदांच्या 12 हजार 522 तसेच 18 मनपाच्या- 2 हजार 951, 82 नगर पालिका/ परिषदाच्या- 477 व 1 हजार 123 खाजगी शैक्षणिक संस्थांच्या-5 हजार 728 अशा एकूण 21 हजार 678 रिक्त पदांच्या भरतीची मागणी नोंदविली आहे.

पदभरतीसाठी उमेदवारांची प्राधान्यक्रमाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येईल, त्याचे संभाव्य वेळापत्रक लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल. उमेदवारांनी पवित्र पोर्टलवरील पदभरतीशी संबंधित सर्व बाबींसाठी शर्वीर्रिींळीींर2022ऽसारळश्र.लेा या ईमेलवर पत्रव्यवहार करावा. पदनिहाय पसंतीक्रम देण्यासाठी 8 फेब्रुवारीपासून संधी देण्यात येईल. तसेच 9 फेब्रुवारीला पसंतीक्रम लॉक केले जाणार असल्याचे देखील स्पष्ट करण्यात आले आहे.

आरक्षण निहाय रिक्त पदे

आरक्षण निहाय रिक्त पदे- अनुसूचित जाती : 3147, अनुसूचित जमाती : 3542, विमुक्त जाती (अ) : 862, भटक्या जमाती (ब) : 404, भटक्या जमाती (क) : 582, भटक्या जमाती (ड) : 493, विशेष मागास प्रवर्ग : 290, इतर मागास प्रवर्ग : 4024, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक : 2324, खुला : 6170 याप्रमाणे आहेत. काही व्यवस्थापनांनी जाहिरातीमध्ये आरक्षणापेक्षा विषयाची पदे कमी नोंद केली आहेत त्यामुळे आरक्षणनिहाय रिक्त पदे जास्त दिसून येत आहेत.

गट निहाय रिक्त पदे

  • पहिली ते पाची : 10240
  • सहावी ते आठवी : 8127
  • नववी 9 ते दहावी : 2176
  • अकरावी ते बारावी : 1135

माध्यमनिहाय रिक्त पदे

मराठी :18373, इंग्रजी : 931, उर्दू :1850, हिन्दी : 410, गुजराथी : 12, कन्नड : 88, तामिळ : 8, बंगाली : 4, तेलुगू : 2 याप्रमाणे आहेत.

हेही वाचा

Back to top button