पुणे : भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा भरपावसात कार्यक्रम, पुण्यात चर्चा | पुढारी

पुणे : भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा भरपावसात कार्यक्रम, पुण्यात चर्चा

पुणे ; पुढारी ऑनलाईन : पुणे शहरातील नवी पेठ येथील सेनादत्त पोलीस चौकी समोरील चौकाचे नामकरण आज सामाजिक कार्यकर्ते स्वर्गीय सुरेश आप्पा माळवदकर असे करण्यात आले. मान्यवरांच्या उपस्थितीत भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. आ. चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते फलकाचे अनावरण झाले.

फलक अनावरणानंतर मुख्य कार्यक्रम सुरुवात झाली. मात्र त्यानंतर काही वेळातच पावसाचेही आगमन झाले. यावेळी आ. चंद्रकांतदादा पाटील यांचे भाषण सुरू असल्याने, त्यांनी मध्येच भाषण न थांबता सुरेश आप्पा माळवदकर यांच्याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या.

दरम्यान मा. आ. चंद्रकांतदादा पाटील यांच्या या भूमिकेचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. या कार्यक्रमाला भाजपा प्रदेश सचिव आणि पुणे शहर प्रभारी धीरज घाटे, माजी उपमहापौर सरस्वती शेंडगे, नगरसेविका स्मिता वस्ते, नगरसेवक रघुनाथ गौडा, ज्येष्ठ साहित्यिक रामदास फुटाणे उपस्थित होते.

Back to top button