वाहतूक व्यवस्था ते शिक्षण.. पुणेकरांनो असे असेल वर्ष 2024 | पुढारी

वाहतूक व्यवस्था ते शिक्षण.. पुणेकरांनो असे असेल वर्ष 2024

पुणे : नववर्ष सोमवारपासून सुरू होत असून, आगामी वर्षभरात पुणेकरांना विविध सकारात्मक बदल अनुभवण्यास मिळणार आहेत. राजकीय क्षेत्रात नवनेतृत्व उदयाला येणार आहे. सार्वजनिक वाहतूकव्यवस्था गतिमान होणार आहे. शैक्षणिक क्षेत्रातही विविध बदल होणार आहेत. महापालिकेत सध्या प्रशासक असून, नवीन नगरसेवक या वर्षी निवडून येण्याची शक्यता आहे. महापालिकेचे काही प्रकल्प पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत. त्याचसमवेत शहरात सुरू असलेले अन्य काही प्रकल्प या वर्षभरात कार्यान्वित होण्याची शक्यता आहे. विविध क्षेत्रांतील या आगामी महत्त्वाच्या घडामोडींचा घेतलेला आढावा.

राजकीय
लोकसभा निवडणुकीत मेमध्ये नवीन खासदाराची निवड
विधानसभा निवडणुकीत ऑक्टोबरमध्ये पुण्यात आठ आमदारांची निवड
महापालिका निवडणूक वर्षअखेरीला होण्याची शक्यता महापालिका / नागरी सुविधा

बहुतांश पुणेकरांना मीटरनुसार पाणीपट्टी आकारणार
सिंहगड रस्त्यावर राजाराम पूल चौक ते फनटाईम थिएटर यादरम्यान नवीन उड्डाणपूल
महापालिकेच्या सर्वच सफाई कामगारांना स्मार्ट बेल्ट मिळणार
स्वच्छतेसाठी वॉकीटॉकीचा वापर
समाविष्ट गावांमध्ये समान पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू होणार
महापालिका मनुष्यबळ वाढविणार
जुन्या पुणे-मुंबई रस्त्याचे खडकीतील रुंदीकरण पूर्ण होणार
विद्यापीठ चौकातील दुहेरी उड्डाणपुलाचे काम सुरू
नदीकाठ सुशोभीकरण प्रकल्पाच्या काही टप्प्याचे लोकार्पण होणार (सार्वजनिक वाहतूक)
महामेट्रोच्या दोन्ही संपूर्ण मार्गांवर मार्चअखेरपर्यंत मेट्रो धावणार
पीएमपीच्या ताफ्यात डबलडेकर बस समाविष्ट
पीएमपीचे लाइव्ह लोकेशन अ‍ॅप येणार
पुणे रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास
नवीन विमानतळ टर्मिनलचे उद्घाटन; प्रवाशांसाठी होणार खुले

पोलिस प्रशासन
पोलिस परिमंडळ वाढणार
नवीन पोलिस ठाणी अस्तित्वात येण्याची शक्यता
वाहतूक दिव्यांचे सिंक्रोनायझिंग वाढविणार
अद्ययावत सीसीटीव्ही कॅमेरे बसविणार
लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी पोलिसांना राहावे लागणार सज्ज

शैक्षणिक
इयत्ता पाचवी आणि आठवीसाठी तोंडी, प्रात्यक्षिक व लेखी स्वरूपाची वार्षिक परीक्षा लागू
अनुत्तीर्ण झाल्यास विद्यार्थ्याला पुनःपरीक्षेत उत्तीर्ण होण्याच्या अटीवर पुढील इयत्तेत प्रवेश
विद्यार्थ्यांसाठी तक्रार
निवारण समिती आणि लोकपालाची नियुक्ती
पाठ्यपुस्तकांना वह्याची पाने जोडून इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांकरिता बालभारतीची एकात्मिक
पुस्तके देणार
अनधिकृत शाळा
आढळून आल्यास शिक्षणाधिकार्‍यांवर कारवाई
राष्ट्रीय पुस्तक न्यासचे नवे केंद्र पुण्यात स्थापन होण्याची चिन्हे
नॅक मूल्यांकन न केलेल्या महाविद्यालयांवर कारवाई
पारंपरिक पदवी अभ्यासक्रमही चार वर्षांचा होण्याची शक्यता

Back to top button