पुणे : डॉक्टर महिलेच्या बाथरूमध्ये एमडी डॉक्टरनेच लावला छुपा कॅमेरा! | पुढारी

पुणे : डॉक्टर महिलेच्या बाथरूमध्ये एमडी डॉक्टरनेच लावला छुपा कॅमेरा!

पुणे; पुढारी वृत्तसेवा : भारती विद्यापीठ परिसरातील प्रशिक्षणार्थी डॉक्टर महिलेच्या बाथरुम व बेडरुममध्ये छुपा कॅमेरा लावणारा सापडला आहे.  हा एक मास्टर इन मेडीसीन (एमडी) डॉक्टरच असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

पोलिसांनी असे कृत्य करणार्‍या एम डी डॉक्टरला तांत्रिक तपासाच्या आधारे बेड्या ठोकल्या. त्याने हे छुपा कॅमेरा बल्ब अ‍ॅमेझॉन या ऑनलाईन साईटवरून मागविल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

अधिक वाचा 

पप्पू वाडेकर खून प्रकरणी दोघे जेरबंद, पुणे पोलिसांची कारवाई

पुणे : कुख्यात गुंड पप्पू वाडेकरचा दगडाने ठेचून खून; नेमकं काय घडलं?

सुजित आबाजीराव जगताप (वय 42) असे अटक केलेल्या डॉक्टराचे नाव आहे. याप्रकरणी एका प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टराने फिर्याद दिल्यानंतर हा गुन्हा दाखल झाला आहे.

डॉक्टर सुजित जगतापचा विवाह झाला आहे. त्याचे शिक्षण एमडीपर्यंत झाले असून त्याचे हिराबाग येथे क्लिनिक आहे.

ही महिला डॉक्टर एका नामांकित महाविदयालयाशी संलग्न रुग्णालयात काम करते. ती रुग्णालयाच्या सर्व्हिस क्वार्टरमध्ये आणखी एका महिला डॉक्टरसह राहते.

अधिक वाचा 

कुख्यात गुंड पप्पू वाडेकर याचा खून, पुणे शहरात खळबळ

पुणे : राजकीय गुरू रघुनाथ येंमुल याला अटक

ती मंगळवारी संध्याकाळी रुग्णालयातील काम उरकल्यावर फ्रेश होण्यासाठी रुमवर आली होती.

यावेळी तीने बाथरुमची लाईट लावली असता ती सुरु झाली नाही. यानंतर बेडरुमची लाईटही सुरु झाली नाही. त्यामुळे तीने इलेक्ट्रीशियनला बोलवले.

त्याने दुरुस्ती करण्यासाठी बाथरुममधील बल्पचे होल्डर खोकल्यावर, आत स्पाय कॅमेरे, त्याचे मेमरी कार्ड आणि बॅकअप आढळला.

यानंतर बेडरुमच्या बल्पचे होल्डर खोलले असता तेथेही असाच प्रकार आढळून आला. यानंतर तिने तातडीने धाव घेत पोलिसांत तक्रार दाखल केली होती.

असा लागला गुन्ह्याचा छडा

गेल्या 4 दिवसांपासून पोलीस परिसरातील संशय वाटत असलेल्यांकडे चौकशी करत होते. दरम्यान एका सीसीटीव्हीमध्ये डॉ. जगताप कैद झाले होते.

त्यांना चौकशीसाठी बोलविल्यानंतर त्यांनी गुन्ह्यांची कबुली दिली.

पोलीस निरीक्षक संगीता यादव यांनी सांगितले की, सुजित जगताप हा निरोलॉजीस्ट आहे. तांत्रिक विश्षलेणाद्वारे पोलीस आरोपीपर्यंत पोहचले. आपण हे का केले हे अजूनही तो सांगत नाही.

गुन्हा उघडकीस येण्यापूर्वी चार दिवसांपूर्वी मागविले होते कॅमेरे डॉ. जगतापने स्पाय कॅमेरे ऑनलाईन माध्यमातून मागविले होते.

त्याने एक कॅमेरा दोन महिन्यापूर्वी खरेदी केल्याचे तर एक कॅमेरा घटनेच्या दोन महिन्यांपूर्वी खरेदी केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

बेडरूमध्ये आणि बाथरूमध्ये बसविलेल्या कॅमेर्‍यामध्येच मेमरी कार्डमध्येच सुविधा होती. त्यामुळे ही माहिती बाहेर लीक झाली नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

दरम्यान, त्याला अटक करून मंगळवारी दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले असता त्याच्याकडे आणखी
तपास करण्यासाठी पोलिस कोठडीची मागणी करण्यात आली.

अटक करण्यात आलेला डॉक्टरचे पुण्यात क्लिनीक आहे. तो पुण्यातील काही प्रसिध्द खासगी हॉस्पीटलमध्ये स्पेशल व्हिजीटसाठी जात होता. महिलेसोबत त्याची ओळख होती परंतु, त्याने हा प्रकार का केला ? हे त्यालाच माहिती नसल्याचे तो तपासात सांगत आहे. गुन्हा करण्यामागचे त्याचे नेमेके काय कारण होते याचा तपास करण्यासाठी त्याला न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
– संगीता यादव, पोलिस निरीक्षक (गुन्हे), भारती विद्यापीठ पोलिस ठाणे.

Back to top button