दुर्दैवी ! मनोरुग्ण मुलाने केला वडिलांचा खून | पुढारी

दुर्दैवी ! मनोरुग्ण मुलाने केला वडिलांचा खून

चाकण : पुढारी वृत्तसेवा :  मनोरुग्ण मुलाने वडिलांसोबत भांडण करून वडिलांच्या डोक्यात अवजड वस्तूने मारून त्यांचा खून केला. ही घटना गुरुवारी (दि. 30) सकाळी शेलपिंपळगाव जवळील दौंडकरवाडी येथे घडली. खंडू लांडे (रा. शेलपिंपळगाव, दौंडकरवाडी, ता. खेड) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी बाबाजी खंडू लांडे (वय 35) यांनी चाकण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार नितीन खंडू लांडे (वय 32) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नितीन याने वडील खंडू यांच्याशी घरातील किरकोळ कारणावरून वाद घातला. त्यातून वडिलांच्या डोक्यात अवजड वस्तूने मारून त्यांना गंभीर जखमी केले. हा प्रकार फिर्यादी यांच्या चुलत भावाने पाहिला आणि त्याबाबत फिर्यादी बाबाजी लांडे यांना फोनवरून माहिती दिली. फिर्यादी कामानिमित्त बाहेर असताना हा प्रकार घडला. दरम्यान, खंडू लांडे यांना चाकण येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथून दुसर्‍या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी हलविण्याचा डॉक्टरांनी सल्ला दिला. त्यानुसार त्यांना दुसर्‍या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान गुरुवारी रात्री खंडू लांडे यांचा मृत्यू झाला. आरोपी मुलगा नितीन हा मनोरुग्ण असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानुसार पुढील कारवाई केली जाणार आहे. चाकण पोलिस तपास करीत आहेत.

हेही वाचा  :

Back to top button