Raj Thackeray met CM Eknath Shinde | राज ठाकरेंच्या भेटीवर मुख्यमंत्री शिंदेंचा खुलासा, नेमकं कारण सांगितलं | पुढारी

Raj Thackeray met CM Eknath Shinde | राज ठाकरेंच्या भेटीवर मुख्यमंत्री शिंदेंचा खुलासा, नेमकं कारण सांगितलं

पुढारी ऑनलाईन डेस्क : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (दि.२) सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांचे मुंबईतील वर्षा निवास्थानी राज ठाकरे यांनी ही भेट घेतली. दरम्यान या दोघांमध्ये महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली. या संदर्भातील माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या अधिकृत ‘X’ अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून देत भेटीचा खुलासा केला आहे. (Raj Thackeray met CM Eknath Shinde)

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (दि.२) सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईतील निवासस्थानी भेट घेतली. मराठी सूचना फलकांची अंमलबजावणी आणि टोल बूथच्या मुद्द्यावर राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने दिल्याचे एएनआयने म्हटले आहे. (Raj Thackeray met CM Eknath Shinde)

मुख्यमंत्री शिंदेंचा भेटीवरून खुलासा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसंदर्भात मुख्यमंत्री शिदे यांनी ट्विटरवरून माहिती दिली आहे. मुख्यमंत्री शिंदेनी केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज वर्षा या निवासस्थानी  येऊन माझी भेट घेतली. या भेटीत राज्यातील टोल नाक्यांचा प्रश्न आणि दुकानांवरील मराठी पाट्या लावण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी आणि दंडात्मक कारवाईबाबत प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. या भेटीवेळी मनसे आमदार राजू पाटील उपस्थित होते, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे. (Raj Thackeray met CM Eknath Shinde)

हेही वाचा:

Back to top button