Crime News : घरी सोडतो म्हणून लैंगिक अत्याचार | पुढारी

Crime News : घरी सोडतो म्हणून लैंगिक अत्याचार

पुणे : आई कामावरून रागवत असल्यामुळे चौदा वर्षांची मुलगी घरातून बाथरूमला जाऊन येते, असे सांगून बाहेर गेली. या तरुणीला घरी सोडण्याच्या बहाण्याने मांजरी येथील पडक्या खोलीत नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचाराबरोबरच अनैसर्गिक कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी दोघांना हडपसर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.अभिषेक गणेश जगताप (20), नीलेश नामदेव यादव (20, रा. मांजरी बुद्रुक) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

याबाबत एका 14 वर्षीय मुलीने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी तिची आई कामावरून रागवत असल्यामुळे घरातून बाथरूमला जाऊन येथे, असे सांगून बाहेर गेली. ती रस्त्याने पायी चालत जात असताना ‘तू कुठे चालली आहे? तुला घरापर्यंत सोडू का?’ असे विचारून अभिषेकने त्याचा मित्र नीलेशला बोलावून घेतले. त्यानंतर आरोपींनी मांजरी येथील एका ठिकाणी पडक्या खोलीत तिला नेऊन तिच्यावर बलात्कार व अनैसर्गिक कृत्य केले.

हेही वाचा

Back to top button