

पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्यात गेल्या दीड महिन्याहून अधिक काळ रेंगाळलेला मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. गेल्या दोन दिवसांंपासून राज्यातील बहुतांश भागांत मुसळधार, तर काही भागांत मध्यम स्वरूपाचा पाऊस मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पडत आहे. 25 सप्टेंबरपर्यंत बहुतांश जिल्ह्यांत हवामान विभागाने 'यलो अलर्ट' दिला आहे. शुक्रवारी (दि. 21) कोकण, घाटमाथा, विदर्भाच्या काही भागांसह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा या भागांत मुसळधार ते मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली आहे. 25 सप्टेंबरपर्यंत मान्सून राज्यात सक्रिय राहणार असून अधिक पावसाची शक्यता आहे.
संबंधित बातम्या :
पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, पुणे, नगर, अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ
हेही वाचा