Nashik : इगतपुरी पट्टयात मुसळधार पावसाचा तडाखा | पुढारी

Nashik : इगतपुरी पट्टयात मुसळधार पावसाचा तडाखा

घोटी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

पावसाळ्यातील शेवटच्या टप्प्यात इगतपुरी, घोटी पट्ट्याला दुपारी साडेचारवाजेपासून मुसळधार पावसाने रात्री उशिरापर्यंत झोडपून काढले. मुसळधार पावसाने घोटी, इगतपुुरी, लहवित येथील जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक ठिकाणी तलावसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती.

मुसळधार पावसामुळे घोटी शहरामधील मायाबाजार संकुल व विजयराज मार्केटमध्ये पाणी साचले असून अनेक दुकानांमध्ये पाणी शिरले. घोटीलगतच्या खेड्यापाड्यांवरसुद्धा मुसळधार पाऊस झाल्याचे वृत्त असून धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु झाला आहे. घोटीत मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी गटारीमधील कचरावर आल्यामुळे दुर्गंधी पसरली असून जागोजागी कचरा साचला आहे.

हेही वाचा :

Back to top button