पुष्पा इम्पॉसिबल : देवी सिंह शेखावतच्या रूपात उर्वशी धोलकियाची एन्ट्री | पुढारी

पुष्पा इम्पॉसिबल : देवी सिंह शेखावतच्या रूपात उर्वशी धोलकियाची एन्ट्री

पुढारी ऑनलाईन डेस्क : सोनी सबवरील पुष्पा इम्पॉसिबल मालिकेत पुष्पा (करुणा पांडे) या एका सिंगल मदरच्या असामान्य प्रवासाचा आलेख मांडला आहे. ती दृढनिर्धार आणि सकारात्मक विचारसरणीच्या बळावर जीवनातील आव्हानांना तोंड देते. अलीकडच्या भागांमध्ये मालिकेत एक अनपेक्षित वळण आले आहे. आयुषी (गुंजन भाटीया) अचानक पुढे आली आहे आणि आपण गोलू (हंस असलोट)ची आई असल्याचे तिने उघड केले आहे. गोलूचा ताबा मिळवण्यासाठी कायद्याचा आधार घेण्याचा तिचा निर्धार आहे. बऱ्याच काळापासून गोलूचा पालक बनलेला महेंद्र (अमीष तन्ना) या गोष्टीचा कडाडून विरोध करतो.

या कथानकाच्या ओघाने आगामी भागांमध्ये देवी सिंह शेखावत या एका हुशार वकीलाच्या रूपात उर्वशी धोलकियाची दमदार एंट्री या मालिकेत होणार आहे. हे कस्टडीचे प्रकरण हाती घेण्यास आधी तयार नसलेली देवी हे बघते की, महेंद्र आणि पुष्पा किती संकटात आहेत. त्यामुळे मग ती हे प्रकरण हाती घेण्यास तयार होते. आपल्या नैपुण्यावर तिचा विश्वास आहे आणि त्याच्या बळावर गोलूचे भवितव्य सुरक्षित करण्यासाठी त्याच्यासाठी योग्य आणि त्याला प्रेम आणि आपुलकी देणारे कुटुंब त्याला मिळवून देण्याचा निर्धार तिने केला आहे. देवीच्या एन्ट्रीमुळे कस्टडीसाठीचा तीव्र लढा मालिकेच्या आगामी भागांमध्ये बघायला मिळणार आहे.

आयुषीविरुद्धच्या लढ्यातदेवी विजय मिळवून देणार का?

देवी सिंहची भूमिका करत असलेली उर्वशी धोलकिया म्हणते, “पुष्पा इम्पॉसिबल एक अत्यंत प्रभावी मालिका आहे, ज्यामध्ये कौटुंबिक नात्यांच्या दृढतेचे चित्रण बघायला मिळते. अशा कुटुंबातील लोक कठीण प्रसंगी एकमेकांच्या पाठीशी उभे राहतात. या मालिकेत पुन्हा येण्याची फारच उत्सुकता आहे कारण या भूमिकेत मला बघण्याची इच्छा प्रेक्षकांनी व्यक्त केली आहे. आपल्या प्रेक्षकांशी जवळीक साधणाऱ्या आणि समुदायात राहताना लोकांच्या मदतीचे महत्त्व दाखवून देणाऱ्या या मालिकेत काम करताना खूप आनंद होत आहे.”

Back to top button