बिबवेवाडी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : अप्पर डेपो परिसरात विकासकामांसाठी महापालिकेने रस्ता खोदून ठेवला असून, गेल्या दोन-तीन महिन्यांपासून ठिकठिकाणी राडारोडा पडून आहे. रस्त्याच्याकडेला असलेल्या व्यावसायिकांच्या दुकानांत यामुळे ग्राहक येत नाहीत. परिणामी, या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. तसेच, वाहनचालक व नागरिकांचीही गैरसोय होत आहे.
संविधान चौक ते अप्पर डेपो परिसरात विकासकामांसाठी रस्ता खोदण्यात आला आहे. ठेकेदाराने खोदाईचा राडारोडा रस्त्याच्या बाजूला परिसरातील दुकानांसमोर ठेवला आहे. परिणामी, गेले दोन ते तीन महिन्यांपासून या दुकानांकडे ग्राहक फिरकत नाहीत. यामुळे हे व्यावसायिक मेटाकुटीला आले असून, त्यांच्यासमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे.
संबंधित बातम्या :
आमच्या दुकानांसमोरील राडारोडा कधी उचलला जाणार, असा सवाल या व्यावसायिकांनी उपस्थित केला आहे.
किमान सणासुदीच्या काळात तरी व्यवसाय करण्यासाठी दुकानांसमोरील अडथळा दूर करावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त
केली आहे.
अप्पर डेपो परिसरात पावसाळी वाहिनी, ड्रेनेज लाइनचे काम सुरू असून, त्याला थोडासा वेळ लागत आहे. ते पूर्ण झाल्यानंतर रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात येईल. तसेच राडारोडाही लवकरात लवकर उचलण्यात येईल.
-अमर शिंदे, कार्यकारी अभियंता,
पथ विभाग, महापालिका
हेही वाचा