Ganeshotsav 2023 : मिठाई विक्रेत्यांवर ‘एफडीए’ची नजर; सणासुदीच्या पार्श्वभूमीवर विशेष मोहीम | पुढारी

Ganeshotsav 2023 : मिठाई विक्रेत्यांवर ‘एफडीए’ची नजर; सणासुदीच्या पार्श्वभूमीवर विशेष मोहीम

पुणे; पुढारी वृत्तसेवा : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मिठाईच्या पदार्थांमधून विषबाधा होऊ नये अथवा भेसळयुक्त पदार्थांची विक्री होऊ नये, यासाठी अन्न आणि औषध प्रशासनातर्फे विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. मोहिमेदरम्यान आढळणार्‍या विक्रेत्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. नागरिकांनीही काळजी घेण्याचे आवाहन ‘एफडीए’तर्फे करण्यात आले आहे.

नागरिकांना सुरक्षित व सकस अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत, यासाठी अधिकार्‍यांनी तपासणी व खाद्य नमुने संकलित करण्याची विशेष मोहीम हाती घेतली आहे. मिठाईच्या ट्रेवर दर्शनी भागात वापरण्यायोग्य दिनांक टाकावा, कच्चे अन्नपदार्थ व खवा परवानाधारक अन्न व्यावसायिकांकडून खरेदी करावा, विक्री बिलावर अन्न सुरक्षा व मानदे कायद्यांतर्गत नोंदणी क्रमांक नमूद करावा, पदार्थ तयार करण्यासाठी पिण्यायोग्य पाण्याचा वापर करावा, अन्नपदार्थ स्वच्छ व सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

विक्रेत्यांनी कामगारांची त्वचा व संसर्गजन्य रोगांची वैद्यकीय तपासणी करावी, मिठाई तयार करताना केवळ फुडग्रेड खाद्यरंगाचा वापर करावा, बंगाली मिठाई 8-10 तासांच्या आत खाण्याबाबत पॅकेजिंग मटेरिअलवर निर्देश देण्यात यावेत, माश्यांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून जाळीदार झाकणे, बंदिस्त शोकेस असावे, असेही आदेश दिल्याचे अन्न आणि औषध प्रशासनाचे सहआयुक्त सु. गं. अन्नपुरे यांनी कळविले आहे.

नागरिकांनी काय काळजी घ्यावी?

  • मिठाई, दुग्धजन्य अन्नपदार्थ खरेदी फक्त नोंदणी/परवानाधारक विक्रेत्यांकडून करावी.
  • मिठाई, दूध व दुग्धजन्य पदार्थ ताजे व आवश्यकतेनुसार खरेदी करावेत.
  • माव्यापासून बनविलेल्या मिठाईचे सेवन शक्यतो 24 तासांच्या आत करावे.
  • मिठाईवर बुरशी आढळल्यास त्यांचे सेवन करू नये.

गणपती मंडळांनी काय काळजी घ्यावी?

  • गणेश मंडळांनी प्रसाद वाटपासाठी षेीलेी.षीीरळ.र्सेीं.ळप या संकेतस्थळावर जाऊन 100 रुपये फी भरून अन्न व औषध प्रशासन यांच्याकडे नोंद करावी.
  • भाविकांसाठी तयार केलेला प्रसाद झाकून ठेवावा; जेणेकरून प्रसादावर धूळ, माती, माश्या, मुंग्या या इतर किटकांचा प्रादुर्भाव होणार नाही.
  • प्रसाद हाताळणार्‍या व्यक्तीने स्वच्छतेचे सर्व नियम पाळावेत.
  • गणेश मंडळांनी आवश्यक तेवढाच ताजा प्रसाद बनवावा.
  • प्रसाद तयार करण्यासाठी व भांडी धुण्यासाठी वापरण्यात येणारे पाणी पिण्यायोग्य असावे.

हेही वाचा

Pune News : ‘झिरो प्रिस्क्रिप्शन’ची अंमलबजावणी नाहीच; ससूनमधील चित्र

Pune news : स्मार्ट सिटीचे अर्धवट प्रकल्प घेण्यास महापालिकेचा नकार

अस्खलित हिंदी बोलणार्‍या अमेरिकन प्रवक्त्या

Back to top button