Ganeshotsav 2023 : आनंदाची बातमी ! कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोलमाफी; सरकारचा मोठा निर्णय | पुढारी

Ganeshotsav 2023 : आनंदाची बातमी ! कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोलमाफी; सरकारचा मोठा निर्णय

पुणे; पुढारी वृत्तसेवा : कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी आनंदाची बातमी आहे. कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांच्या वाहनांना टोल मधून सूट देण्याचा मोठा निर्णय सरकारने घेतला आहे. तसेच, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसला सुद्धा यावेळी टोल मधून सूट देण्यात येणार आहे. टोलमधून सवलत देण्याबाबत दिनांक १५ सप्टेंबर २०२३ रोजी निर्णय झाला आहे.

संबंधित बातम्या :

त्यामुळे दिनांक १६ सप्टेंबर ते ०१ ऑक्टोंबर 2023 या कालावधीत ही सवलत कोकणात जाणाऱ्या भाविकांच्या वाहनांना आणि एसटीला सवलत देण्यात आली आहे. मात्र अशा वाहनांना पोलीस व परिवहन विभागाकडून पासेस घ्यावे लागणार आहेत. त्यानुसार ही सुविधा पोलीस स्टेशन व वाहतुक पोलीस चौकी येथे तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालयात उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

येथे मिळतील सवलतीचे पास

भाविकांनी आपल्या वाहनांचे तसेच एसटीच्या बसचे सर्व वैध कागदपत्रे सादर केल्यावर पासेस प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे ३९, डॉ. आंबेडकर रोड, संगम ब्रिज जवळ, पुणे येथून सकाळी ०९.४५ ते ०६.१५ या कार्यालयीन वेळेत पासेस घेऊन जावेत, असे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

हेही वाचा

Pune Weather Update : पुण्यात दोन दिवस पावसाची शक्यता

अनोखी ‘पोलर रिंग’ आकाशगंगा

भांडुपमध्ये फुटपाथ खचून सहा दुचाकींचे नुकसान

Back to top button