एसटी-महामेट्रोचा वाद : आराखडा-एसटी स्थानकावरून ‘ तू तू मैं मैं ’; | पुढारी

एसटी-महामेट्रोचा वाद : आराखडा-एसटी स्थानकावरून ‘ तू तू मैं मैं ’;

पुणे  : पुढारी वृत्तसेवा : एकीकडे पुणे विभागातील एसटी प्रशासन शिवाजीनगर येथील मेट्रो स्थानक लवकर बांधून द्या, असे म्हणत आहे, तर दुसरीकडे मेट्रो प्रशासन एसटीने अगोदर आम्हाला बांधकामाचा आराखडा म्हणजेच प्लॅन द्यावा, असे म्हणत आहे. अशा ‘तू तू मैं मैं’मध्ये एसटी प्रवाशांचे हाल होत असून, दोन्ही प्रशासनाने यासंदर्भात वाद न घालता याबाबतचा निर्णय तातडीने घ्यावा, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.
शिवाजीनगर येथील एमएसआरटीसीची 34 गुंठे जागा आम्ही मेट्रो स्थानकासाठी घेतली आहे. त्या जागेच्याच किमतीमध्ये एसटीला मेट्रोकडून बांधकाम करून देण्यात येणार आहे. मात्र, त्यासाठी आवश्यक असलेला प्लॅन एसटी आम्हाला देणार आहे. परंतु, अद्यापपर्यंत असा कोणताही प्लॅन आम्हाला मिळालेला नाही. प्लॅन मिळाल्यानंतर एमओयू होऊन एसटीला या ठिकाणी बांधकाम करून दिले जाईल.
                                                                           – हेमंत सोनवणे, कार्यकारी संचालक, महामेट्रो
करारानुसार मेट्रोने आम्हाला या जागी तातडीने बांधकाम करून द्यावे. जेणेकरून आम्हाला प्रवाशांकरिता शिवाजीनगर येथून आमची बससेवा पूर्वीप्रमाणे सुरू करता येईल.
                                                 – सचिन शिंदे, विभागीय वाहतूक अधिकारी, एसटी, पुणे विभाग
एसटीच्या शिवाजीनगर स्थानकाच्या स्थलांतराचा प्रश्न गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. करारानुसार महामेट्रो शिवाजीनगर येथील एसटीचे स्थानक बांधून देणार आहे. मात्र, याबाबत सध्या नुसत्याच मीटिंग सुरू असून, कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात येत नाही.
त्यामुळे प्रवाशांना एसटीच्या प्रवासासाठी लांब असलेल्या वाकडेवाडी स्थानकावर जावे लागत आहे. त्यामुळे एसटी आणि पीएमपी प्रशासनाने तातडीने शिवाजीनगर स्थानकाचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी जोर धरत आहे.
हेही वाचा :

Back to top button