पुणे : स्वच्छतागृहे ? छे !! ही तर दुर्गंधीगृहे… | पुढारी

 पुणे : स्वच्छतागृहे ? छे !! ही तर दुर्गंधीगृहे...

पुणे : शहरातील पेट्रोल पंपांवर वाहनचालक व नागरिकांच्या सोयीसाठी बांधलेल्या स्वच्छतागृहांच्या परिसरात मोठ्या प्रमाणत दुर्गंधी असल्याचे दैनिक ‘पुढारी’ने केलेल्या पाहणीत समोर आले आहे. स्वच्छतागृहांपासून काही अंतरावरच दुर्गंधी येत असल्याने ही स्वच्छतागृहे आहेत की दुर्गंधीगृहे, असा प्रश्न पडतो. नागरिकांना एखाद्या ठिकाणी काहीतरी कारणासाठी थांबावे लागते किंवा ज्या ठिकाणी नागरिकांची वर्दळ असते, अशा ठिकाणी स्त्री आणि पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहांची व्यवस्था असावी लागते. त्यानुसार पेट्रोल पंपांवर स्वच्छतागृह बंधनकारक आहे. शहरातील पेट्रोल पंपांवर स्वच्छतागृहे आहेत. या स्वच्छतागृहांची पाहणी केल्यानंतर ही स्वच्छतागृहे अस्वच्छतेची ठिकाणे असल्याचे समोर आले. स्वच्छतागृहांजवळ जाण्यापूर्वीच दुर्गंधी येते.

एकाच ठिकाणी स्वतंत्र व्यवस्था
पाहणी केलेल्या 12 पेट्रोल पंपांपैकी केवळ नवलेपुल-कात्रज रस्त्यावरील एका पेट्रोल पंपावर स्त्री आणि पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह आहे. उर्वरित सर्व पेट्रोल पंपांवर स्त्री-पुरुषांसाठी एकच स्वच्छतागृह आहे. त्यातही कर्मचार्‍यांसाठी अंघोळीचे साहित्य, स्वच्छतेचा अभाव, नळांमधून टिपकणारे पाणी, दरवाजांचा कडीकोयंडा गायब, अशी परिस्थिती आहे. काही स्वच्छतागृहांमध्ये पाण्याचाही पत्ता नाही. या सर्व परिस्थितीमुळे वाहनचालक व नागरिक पेट्रोल पंपांवरील स्वच्छतागृह वापरण्याचे नाव घेत नाहीत.

हेही वाचा :

अहमदनगर : काँग्रेसने ओबीसींना आरक्षणापासून वंचित ठेवले

पुणे-पिंपरी चिंचवड प्रवास होणार सुकर

Back to top button