भाजपच्या फोडाफोडीमुळे तरुणवर्ग राजकारणापासून दूर जाण्याची शक्यता | पुढारी

भाजपच्या फोडाफोडीमुळे तरुणवर्ग राजकारणापासून दूर जाण्याची शक्यता

मंचर(पुणे); पुढारी वृत्तसेवा : राज्यातील सध्याच्या राजकारणाबाबत असंतोष आहे. भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणामुळे तरुणवर्ग राजकारणापासून दूर जाण्याची शक्यता आहे, असे मत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख सुरेश भोर यांनी व्यक्त केले.
मंचर (ता. आंबेगाव) येथे नगरपंचायतीसमोर आंबेगाव तालुक्यातील ज्येष्ठ शिवसैनिक, गुणवंत विद्यार्थी गुणगौरव आणि पत्रकार सन्मान सोहळा झाला.

याप्रसंगी महिला आघाडी जिल्हा संपर्कप्रमुख विजया शिंदे, जिल्हाप्रमुख श्रद्धा कदम, जुन्नर तालुकाप्रमुख माउली खंडागळे, तालुकाप्रमुख दिलीप पवळे, तालुका उपप्रमुख चंद्रकला पिंगळे, भरत मोरे, युवासेना तालुकाप्रमुख विवेक पिंगळे, वाहतूक सेना तालुकाप्रमुख संजय चिंचपुरे, मंचर शहरप्रमुख सुवर्णा डोंगरे याच्यासह विद्यार्थी, शिक्षक तसेच पत्रकार बांधव उपस्थित होते.

तालुकाप्रमुख दिलीप पवळे यांनी सध्याच्या राजकारणाबाबत असंतोष व्यक्त करत महाराष्ट्रातील जनता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मागे ठामपणे उभी आहे, असे मत व्यक्त केले. महिला आघाडी आंबेगाव तालुका संघटक प्रा. सुरेखा निघोट यांनी सर्वांचे स्वागत करून विद्यार्थ्यांना अभ्यास, चिकाटीचे महत्त्व सांगितले. कार्यक्रमाचे संयोजक आंबेगाव तालुका शिवसेना नेते बाबाजीशेठ कराळे होते. सूत्रसंचालन अमित कातळे यांनी प्रास्ताविक शहरप्रमुख सुवर्णा डोंगरे यांनी, स्वागत प्रा. अनिल निघोट यांनी तर युवा सेना तालुकाप्रमुख विवेक पिंगळे यांनी आभार मानले.

Back to top button