तीन वर्षे विधी प्रवेशासाठी आजपासून करा नोंदणी | पुढारी

तीन वर्षे विधी प्रवेशासाठी आजपासून करा नोंदणी

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  सरकारी कामकाजापुरत्या मर्यादित असलेल्या विधी क्षेत्रात आता अमर्याद संधी निर्माण झाल्या आहेत. परिणामी, कायद्याचे शिक्षण घेण्याकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढला आहे. त्यामुळेच विधी पाच वर्षे अभ्यासक्रमासाठी 13 हजारांवर विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. तर विधी तीन वर्षे प्रवेशासाठी आजपासून नोंदणी करण्यात येणार आहे. विधी क्षेत्राचा विस्तार वाढत असून, विधीच्या विद्यार्थ्यांची मागणीही दिवसागणिक वाढत आहे.

बहुतांश विद्यार्थी कायद्याचे ज्ञान मिळावे, या उद्देशाने जोडशिक्षण म्हणूनही विधी अभ्यास क्रमाला प्रवेश घेत आहेत. शिवाय या क्षेत्रातील विविध करिअरच्या संधींविषयी माहिती मिळाल्यामुळे विधी अभ्यासक्रमांना गेल्या काही वर्षांपासून प्रवेश घेण्याच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे.

Back to top button