परदेशांतील वैद्यकीय शिक्षणाच्या संधींसाठी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन | पुढारी

परदेशांतील वैद्यकीय शिक्षणाच्या संधींसाठी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन

पुणे : यंदा 21 लाखापेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी नीट या प्रवेशपरीक्षेत भाग घेतला आहे. तथापि महाविद्यालयांमध्ये प्रवेशाबद्दलची अनिश्चितता लक्षात घेतली, तर अनेक विद्यार्थी परदेशांत वैद्यकीय शिक्षण घेऊ इच्छितात. त्याची तयारी कशी करावी, यासाठी मार्गदर्शनपर शिबिर फ्यूचर डॉक्टर एज्युकेशन सर्व्हिसेस या संस्थेतर्फे आयोजित करण्यात आले आहे.

एमबीबीएस अ‍ॅडमिशन महाकुंभ अशा स्वरुपाचे हे शिबिर 992, टिळक रस्ता, दादावाडी, शुक्रवार पेठ येथे येत्या 21 मे रोजी सकाळी 11 वाजता होईल. याकरीता विद्यार्थ्यांनी व पलकांनी आगाऊ नावनोंदणी करणे आवश्यक आहे, अशी माहिती फ्यूचर डॉक्टरने दिली आहे.

या शिबिरात परदेशातील विविध नामांकित विद्यापीठांबद्दलची माहिती देण्यात येईल. तसेच या विद्यापीठांचे शुल्क, तेथील प्रवेश प्रक्रिया, अभ्यासक्रम, राहण्याची व जेवण्याची सुविधा अशा अनेक मुद्यांबाबत महत्त्वाची माहिती पुरविण्यात येईल. रुबी मेडिकल सर्व्हिसेसमधील सल्लागार रेडिओलॉजिस्ट डॉ. प्रवीण दोरखे, सह्याद्री हॉस्पिटलमधील सल्लागार फिजिशियन डॉ. शैलेश कांचन पाटील, कोल्हापूर येथील सल्लागार पॅथॉलॉजिस्ट डॉ. श्रेयश जुवेकर, तसेच फ्यूचर डॉक्टर एज्युकेशन सर्व्हिसेसचे संस्थापक डॉ. अमित बोराडे हे या शिबिरात विद्यार्थी व पालक यांना मोलाचे मार्गदर्शन करणार आहेत.

Back to top button