पुण्यात पावसाची जोरदार बॅटिंग… | पुढारी

पुण्यात पावसाची जोरदार बॅटिंग...

पुणे: रविवार पाठोपाठ सोमवारी देखील शहरात पावसाने जोरदार बॅटिंग केली. अक्षरश: पावसाळ्यासारखा पाऊस कोसळत होता. सायंकाळी साडे पाच ते साडे सहा असे तासभर पावसाने पुणेकरांना झोडपून काढले. पावसाचा जोर एवढा होता की, रस्त्यावरून जाणारे वाहनचालक आणि पादचारी यांनी भिजत जाऊन आडोशाच्या जागा शोधल्या.

सोमवारी सकाळपासूनच प्रचंड उकाडा जाणवत होता. दुपारी तीनच्या सुमारास उकाडा शिगेला पोहचून अंगाची लाहीलाही झाली. सायंकाळी साडेपाच नंतर आभाळ काळ्याभोर ढगांनी दाटून आले व जोरदार पावसाला सुरुवात झाली. लहान मुलांनी या पावसात मनोसोक्त भिजण्याचा आनंद घेतला.

Back to top button