पुणे शहरात आजपासून ६ मेपर्यंत पावसाचा अंदाज | पुढारी

पुणे शहरात आजपासून ६ मेपर्यंत पावसाचा अंदाज

पुणे, पुढारी वृत्तसेवा: शहरात मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे. मार्च व एप्रिल महिन्यांत शहरात सतत पाऊस झाला. दोन महिन्यांत शिवाजीनगर भागात सरासरी ४५ मिमी, तर पाषाण भागात ५५ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली.

यंदा उन्हाळ्यात सरासरीपेक्षा ७९ टक्के पाऊस जास्त झाला आहे. दरम्यान, बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रभाव अजूनही शहरावर असल्याने शहरात १ ते ६ मेपर्यंत पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

Back to top button